महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | ऑर्डर कँसल केल्यामुळे झोमॅटो डिलीव्हरी बॉयने फोडले महिलेचे नाक
बंगळुरुत ऑर्डर कँसल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने महिलेचे बुक्की मारुन नाकाचे हाड तोडल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. त्या डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर इतक्या जोराने बुक्की मारली की, त्या महिलेच्या नाकाचे हाड तुटले आणि रस्क्तस्राव सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओदेखील त्या महिलेने शेअर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई-महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास | पोलिसांचं तोंड काळं झालं बोलणं फडणवीसांना शोभतं का
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
तिथे फक्त संशय | अन्वय नाईक प्रकरणी सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावं तरी भाजपवाले शांत होते
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. परंतु, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भारतीय जनता पक्षाने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
कर नाही त्याला डर कशाला? | सचिन वाझे स्वत:हून ATS कार्यालयात चौकशीसाठी हजर
कर नाही त्याला डर कशाला? याच उद्धेशाने पोलीस अधिकारी सचिन वाझे स्वतःहून ATS कार्यालयात हजर झाले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने जवळपास १० तास चौकशी केल्याचं वृत्त आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली.
4 वर्षांपूर्वी -
खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया केस | NIA' कडून मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर 25 फेब्रुवारीला आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेच (NIA) ने सुरु केला आहे. मंगळवारी एक टीम मुंबईत पोहचली आहे. या टीमने मुंबईत येताच विविध ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIAची टीम स्कॉर्पियो गाडीच्या मागे दोन वेळेस दिसून आलेल्या इनोव्हा गाडीच्या तपासाच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी - गृहमंत्री
दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट सुद्धा लिहिले होते. त्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख यांचे शेवटचे लोकेशन वसई आणि मी वसईत राहतो या निष्कर्षाने आरोप म्हणजे...
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
4 वर्षांपूर्वी -
स्कॉर्पिओ पार्क तर इनोव्हाच्या घिरट्या | इनोव्हा चालकाने PPE किट वापरल्याची माहिती
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घराबाहेर स्काॅर्पिओत जिलेटिनच्या छड्या आढळल्याच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी त्याचे आदेश दिले आहेत. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांचे दहशतवाद प्रतिबंधक पथकच (एटीएस) करेल.
4 वर्षांपूर्वी -
मुलीने प्रेमविवाह केला म्हणून जावयावर सुपारी देऊन खुनी हल्ला | भाजपाच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा
भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तपासाला वेग | ठाणे पोलिसांना मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालं
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ बंगल्यासमोरील स्फोटके प्रकरणातील स्काॅर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. मात्र या अहवालात मृत्यू कसा झाला याचा उल्लेख नाही. मनसुख यांचा व्हिसेरा मुंबईतील रासायनिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. इकडे, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा-रेतीबंदर या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
4 वर्षांपूर्वी -
पूजाचा लॅपटॉप आणून द्या | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ अजून उकलले नाही. पुणे पोलिसांनी आता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांच्या या नोटीसीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर अवैध सावकरी | भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षाच्या घरावर सहाय्यक निबंधकांची धाड
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली आहे. अधटराव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे - गृहमंत्री
काल शुक्रवारी सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात सापडला होता. त्या ठिकाणी आज सकाळीच ठाणे पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसरांची कसून पाहणी सुरू केली असून हिरेन मृत्यूप्रकरणी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मानसिक स्थितीबाबत मनसुख हिरेन यांनी पोलिसांना लेखी पत्र दिलेलं | वझेंची प्रतिक्रियाही आली
मुकेश अंबानींच्या अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक हिरेन मनसुख यांचा मृतदेह कळवा खाडीत आज आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुरूवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मनसुख हिरेन यांचा मुलगा नेहमीप्रमाणे दुकानात जेवणाचा डब्बा घेवून आला. जेवण उरकून साडे आठच्या सुमारास मुलाला दुकानातच थांबवून मनसुख यांनी मी बाहेर जाऊन येतो असे सांगून दुचाकीवरून गेले होते, अशी माहिती त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलेच्या घरात घुसून भाजप नगरसेवकाकडून महिलेचा विनयभंग | आक्रमक भाजप नेते शांत
मुरबाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मी लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो | मी फक्त तिला उचलून रिक्षात ठेवलं - धनराज घोगरे
मागील काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भाजप नगरसेवकाचे नावही समोर येत आहे. भाजपच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाचा लॅपटॉप भाजपच्या नगरसेवकाने गायब करून चित्रा वाघ यांना माहिती पुरवली | बीडमध्ये तक्रार
मागील काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचे नाव देखील समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्य समोर येतंय | पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवकाने चोरल्याचा संशय | अन इथेच शिजलं?....
राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मंत्र्याची CD व्हायरल | नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून खळबळ माजली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल