महत्वाच्या बातम्या
-
तृतीयपंथीयांचा रस्त्यावर धुडगूस | वाहतूक पोलिसाला मारहाण | पोलिसांकडून अटक
मुंबईत रहदारीच्या ठिकाणी धुडगूस घालण्याचे प्रकार काही जुने राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी एका महिलेने ट्राफिक पोलिसांच्या कॉलरला धरून त्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या महिलेला चांगलीच अद्दल घडवली होती.
4 वर्षांपूर्वी -
अटक झालेला भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष बांगलादेशी | राष्ट्रवादीचं भाजपवर टीकास्त्र
मालवणी पोलीस ठाण्याच्या दहतवाद विरोधी पथकाने मालाड मालवणीच्या आंबोजवाडी, आंबेडक चौक, गेट नं. 8 येथे धाड टाकून रुबेल जोनू शेख या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं. तो बांग्लादेशच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावचा रहिवासी असल्याचं उघड झालं. कोणत्याही कागदपत्राशिवाय त्याने 2011मध्ये भारतात प्रवेश करून मालाडमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे तो भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवकचा अध्यक्ष आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुख्यात गुंडाची तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणुक | सोबत ३०० गाड्यांचा ताफा
कूविख्यात गजानन मारणे याची 2 खुनातून निर्देश मुक्तता झाल्यानंतर त्याची काल तळोजा कारागृहातून सुटका झाली. यानंतर महाराष्ट्राचा ‘किंग’ असे स्टेटस टाकत चाहत्यांनी त्याची महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली. पुण्यात त्याने ‘रॉयल इंट्री’ तर केलीच पण त्याच्या या गाड्यांचा ताफा पाहून चांगलीच खळबळ उडाली होती. एकीकडे ‘मोहोळ’ने जेलबाहेर पडल्यानंतर शहरात एका कार्यक्रमाला आणि इतर ठिकाणी हजेरी लावत ताकत दाखवली आणि दुसरीकडे गजानन मारणे याने इंट्रीच रॉयल केल्याने पोलिसांच्या डोकेदुखी वाढली होती.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणची हत्या नाही | तर पूर्णपणे आत्महत्या आहे - धनंजय मुंडे
मागील काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असून, पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव गोवण्यात आल्यानं अनेक राजकीय पडसादही उमटत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चुकूनही स्कॅन करू नका QR Code | अन्यथा तुमचं अकाऊंट रिकामं होईल
अलीकडे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवले जात आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
पूजा आणि अरूण वर्गमित्र होते | पण क्लिपमधील आवाज अरूणचा नाही | ग्रामस्थांचा दावा
परळी येथील मूळ रहिवासी युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आता पुढे येत असून विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण लक्षपूर्वक पाहिले तर यात आतापर्यंत बरीच गुंतागुंतीची माहिती आणि खुलाशे समोर येत असल्याने हे प्रकरण नेमके काय ?हे स्पष्ट होत नाहीये. त्यानंतर तिचे कुटुंबीय पुढे येऊ लागल्याने वास्तव समोर येण्यास सुरुवात झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली | पोलीस जबाबात माहिती
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवला आहे. यावर पुणे पोलिसांनी “पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असे सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही”, असे स्पष्टीकरण दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिच्या अंगावर पोल्ट्री फार्मचं कर्ज | २५ लाखाच्या नुकसानामुळे ती त्रस्त होती - वडिलांची प्रतिक्रिया
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार | 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
प्रवासी ट्रेनच्या शौचालयात एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान ही घटना घडली. घटनेची गंभीर नोंद घेत ठाणे पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणावर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आरोप आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी रविवारी दिली.
4 वर्षांपूर्वी -
परळीत राहून २ वर्षे भाजपमध्ये काम | पण त्यानंतर राजकीय कलाटणी...
मागील २-३ दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात पुजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्म्हत्येवरून राजकरण तापलं आहे… याचं कारण असं की यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे… तसेच काही ऑडियो क्लिप देखील वायरल झाल्या आहेत…या सगळ्यात भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे… आणि सरकारनं लवकरात लवकर या विषयावर करवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्याच्या वानवडी येथील पूजा चव्हाण नावाच्या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण मिळालंय. तिच्याबाबत आता अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. ती नेमकी पुण्यात का आली होती?
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | पोलिसांकडून अरुण राठोडचा शोध सुरु
राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या कथित ऑडिओ क्लिपमधील अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण | आ. पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल
जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग | रोड रोमिओला ६ महिने कारावासाची शिक्षा
स्त्रियांच्या होणाऱ्या विनयभंगावर न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात एक निर्णय देत एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दीप सिद्धूने रचला होता प्लान | शेतकरी नाहक बदनाम | पोलिसांकडे खुलासा
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुणाल कामराकडून प्रतिज्ञापत्रामार्फत सुप्रीम कोर्टालाच लोकशाहीच्या मूलतत्त्वांचा धडा
कोर्टाच्या अवमानप्रकारणी खटला सुरु असणाऱ्या स्टँडअप कॉमेडी कलाकार कुणाल कामरा याने आपल्या समर्थनार्थ कोर्टात आपली बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. मी केलेली ट्विट्स देशातील लोकांचा आपल्या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास ढळावा या उद्देशाने केला नव्हती. आपल्या ट्विट्समुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली कोर्टाची पाळेमुळे हादरतील असं म्हणणं माझ्या क्षमतेला गरजेपेक्षा जास्त समजणं असल्याची’ उपहासपूर्ण मात्र ठाम टिपण्णी या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांवर FIR | आणि उपद्रव माजवणाऱ्यांना केलं फरार | आप'चं टीकास्त्र
दिल्लीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला होता. यावेळी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठा हिंसाचार झाला. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख | अखेर दुरुस्त
रावेर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केलेला स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना भडकावणारा दीप सिद्धू भाजपा कार्यकर्ता | पंतप्रधानांबरोबर फोटो | शेतकरी आक्रमक
मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
हॉलिडेसाठी १२ हजार डॉलर आणि ४० लाख फिक्सिंगसाठी दिले | पार्थो दासगुप्तांचा कबुलनामा
बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना लिखित स्वरूपात दिलेल्या काबुलनाम्यात अनेक धक्कादायक गोष्टी मान्य केल्या आहेत. त्यामध्ये विदेशात सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी १२ हजार डॉलर आणि TRP रेटिंग फिक्सिंगसाठी वेगळे ४० लाख रुपये दिल्याचं मान्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा