महत्वाच्या बातम्या
-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड महत्वाचे | तरी होमगार्ड डीजी परमबीर सिंग गायब?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीसंदर्भात आरोप लावून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या मोठ्या सुटीवर गेले असून अजुनही ते कामावर हजर न झाल्याने आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या प्रकरणी ईडीकडून देशमुखांविरोधात फास आवळला जात असतानाच परमबीर सिंग यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरत आहे हे येथे उल्लेखनीय.
3 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर | जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण
जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. ही संतापजनक घटना दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे शनिवारी घडली. यात पाच जण जबर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल | व्यापाऱ्याकडून ९ लाख खंडणी आणि महागडे फोन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये ऑडीओ क्लिप बॉम्ब | तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा | तो लोकप्रतिनिधी?
लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले”, असं हृदयाला बोचणारे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Param Bir Singh | होमगार्ड्स बदली पासून रजेवर | आता फोन बंद | ठाणे पोलीस पुढच्या तयारीला...
ठाणे पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर ५ दिवसांनी, सूत्रांनी सीएनएन न्युज18 ‘ला ते चंदीगड येथील त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
वसुली प्रकरण | परमबीर सिंह चांदीवाला समितीसमोर आलेच नाही | आयोगानं ठोठावला दंड
परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Committee) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर उपस्थित न झाल्याने परमबीर सिंह यांना पंचवीस हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते.
3 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड | नितीन लांडगेंना ताब्यात घेतलं | काँट्रॅक्टर्स धास्तावले
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान ही कारवाई नेमकी कुणावर झाली? या कारवाईत किती रुपये ताब्यात घेतले गेले? याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
नोकरीवर EPF कापला जातो? | बॅलेन्स चेक करा | EPFO कर्मचाऱ्यांकडून २१ कोटींची हेराफेरी
EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मार्च २०२० ते जून २०२१ या कोरोना संकटाच्या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधातून २१ कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे २१ कोटी रुपये काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी प्रकरण । कोर्टाच्या देखरेखीखाली विशेष तपास करावा । सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणावरून केंद्र सरकारला नोटीस बजाविली आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावर न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास करण्यात यावा, अशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
बीएचआर घोटाळा | फरार भाजप आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर
ज्यातील बहुचर्चित बीएचआर अपहार प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी अनेक दिग्गज गोत्यात अडकले आहेत. याच प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | गजानन काळे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | आता महिला संघटना आयुक्तांकडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात गुन्हा दाखल | परमबीरवर एका बिल्डरकडून वसुली केल्याचा आरोप | SIT तपास सुरु
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या तपासात अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे उघड होत आहे. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड छोटा शकील याचा भाऊ अन्वर याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच इतर दोन जणांवर वसुलीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | गजानन काळे प्रकरणी पोलिसांना सेटलमेंटचे आदेश? | चित्रा वाघ यांची राज्य सरकारकडे विचारणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
3 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | अडचणीत वाढताच गिरीश महाजन म्हणाले, सुनील झंवर सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय
बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी मुख्य संशयीत सुनील झंवर यांना अटक झाली आहे. सुनील झंवर यांना अटक झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. सुनील झंवर हे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचा पुनरोच्चार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंवर पत्नीकडून अनैतिक संबंध, छळ व मारहाणीचे आरोप | अटकेची शक्यता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून दोन महिलांना जाळले | महिलांची प्रकृती चिंताजनक
रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून फ्लॅट पेटवून दिल्याने दोन महिला जळून गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर येथील भाविक इमारतीत घडली. सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत असे पेट्रोलने दोन महिलांना जाळणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली, मात्र घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याबाबत पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
दरमहा 5 लाख कमवण्याचे अमीष देऊन 1.36 कोटी हडपले | शिल्पा शेट्टी व तिच्या आई विरुद्ध FIR दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या एका महिला उद्योजकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्योत्सना चौहान असे त्या महिलेचे नाव असून तिने दिव्य मराठीशी बोलताना आपबिती मांडली आहे. शिल्पा शेट्टी आणि आईन सुनंदा यांच्या कंपनीने आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. ज्योत्सना सांगते, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनऊ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते.
3 वर्षांपूर्वी -
पॉर्नोग्राफी प्रकरण | शर्लिन चोप्राच्या ८ तास चौकशीनंतर राज कुंद्रा अधिकच अडचणीत
पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज कुंद्राची अटक योग्यच | मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
न्यायमुर्ती मृत्यू प्रकरण | न्यायाधीशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि असहकार्य करणाऱ्या CBI'ला सुप्रीम कोर्टाची नोटीस
धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळेस रणधीर वर्मा चौक येथे एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केदा झाला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल