महत्वाच्या बातम्या
-
५ मिनिटांपूर्वी २ कोटीत विकलेली जमीन ट्रस्टने १८.५ कोटीला खरेदी केली | श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप
अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अँटिगा अपहरणामागे भारतीय एजन्सींचा हात, भारतात राजकीय शक्तींपासून जीवाला धोका - मेहुल चौकसीच्या वकिलाचा दावा
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चौकसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेहुल चौकसी याला अँटिगामधून डोमिनिकामध्ये आणण्यात आले असून तेथून त्याला भारतात आणण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मेहुल चौकसी यांने डोमिनिका उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती याचिका नाकारत पळून जाण्याचा धोका असल्याचे सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
कैऱ्या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले | मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल
पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. कैऱ्या तोडल्या म्हणून शेतमालकासह सालदाराने दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला 2 तास झाडाला बांधून ठेवले. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल पण केला. धक्कादायक म्हणजे, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी देखील केली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील व प्रवीण पावऱ्या अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | काठी नगरपालिका सरकारी साहित्य चोरी प्रकरणी शुभेंदू अधिकारी आणि बंधूंवर गुन्हा दाखल
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्यावर काठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नगरपालिकामधून सरकारी साहित्य चोरुन नेण्याचे आरोप लावण्यात आले आहे. हा गुन्हा काठी नगरपालिका प्रशासकीय मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी 1 जून रोजी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त २ दिवसांपासून बेपत्ता | हे होतं शेवटचे लोकेशन...
वसई विरार महापालिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे आणि त्यामुळे शहरात नेमकं काय सुरु आहे याची चर्चा रंगली आहे. वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.
4 वर्षांपूर्वी -
जावयाची विकृती | सासूबाईंनी बायकोला माहेरी नेल्याचा रागातून सासूबाईंना पॉर्न व्हिडीओ पाठवले
तेलंगना राज्यातील हैद्रबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका जावयाने अत्यंत धक्कादायक कृत्य केलं. बायकोला आपल्या मनाविरुद्ध माहेरी नेल्याचा राग जावयाने भयंकर पद्धतीने काढला असून त्याने स्वतःच्या सासूच्याच फोनवर अश्लील व्हिडीओ क्लीप पाठवल्या. यामुळे खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राणे स्वतः पत्रकारितेत | तरी लिखाणावरून लोकपत्र वृत्तपत्राच्या कार्यालयावर समर्थकांचा हल्ला
नारायण राणे स्वतः पत्रकारितेत असून प्रहार नावाचं वृत्तपत्रं चालवतात. मात्र आज घडलेल्या धक्कादायक प्रकारातून त्यांनी स्वतःच पत्रकारितेची मूल्य आणि स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळालं. कारण लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग आणि सचिन वाझेच वसुली गॅंग चालवत होते का? | प्रसिद्ध कार डिझायनर छाबरियांचाही आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा दावाही छाबरिया यांनी केला आहे. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | 'पतंजलि' भेसळयुक्त खाद्यतेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या धाडीनंतर कारखाना सील
एकीकडे भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) गुरुवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली. अॅलोपथीबाबत अप्रामाणिक आणि चुकीचे विचार मांडल्याबद्दल बाबांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणीही करण्यात आली आहे. रामदेव बाबा यांनी प्रस्थापित आणि मान्यताप्राप्त पद्धत आणि औषधांबाबत जाणीवपूर्वक चुकीची, निराधार माहिती पसरवली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पैलवान सागर मर्डर केस | सुशील कुमारचा छत्रसाल स्टेडिअममधील मारहाणीचा VIDEO आला समोर
छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पैलवान सागर रानाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऑलिम्पियन सुशील कुमार मित्रांसोबत सागरला हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुशील कुमारने स्वत: मित्राच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून कुस्तीच्या सर्कीटमध्ये त्याचा वचक राहील.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या टीमने रश्मी शुक्लांचा हैदराबादेतील निवासस्थानी जबाब नोंदवला
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्यावर 24 मे पर्यंत अटकेची कारवाई करू नये - मुंबई हायकोर्ट
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मयुरेश राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांची तीन स्वतंत्र तक्रारींवर ‘एसीबी’कडून गोपनीय चौकशी सुरु
विवादित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास परमबीर सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. ही समिती नेमल्यानंतर विरोधकांनी या समितीला कोणतेही अधिकार नसल्याचे सांगत अनिल देशमुख यांची चौकशी निव्वळ फार्स असल्याचे म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय
महाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉन अभी जिंदा है! छोटा राजनच्या मृत्यूची अफवा
दरम्यान, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही यावेळी शुक्ला यांनी केला होता. त्याचप्रमाणे, चौकशीकरिता दिलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच आता खंडणी म्हणजे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. 2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही यावेळी शुक्ला यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, चौकशीकरिता दिलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा