सीबीआयने आमच्या घरात कार्यालय उघडावे, ये-जा करण्याचा पैसा बचत होईल, तेजस्वी यांनी CBI आणि भाजपाची उडवली खिल्ली
Bihar DCM Tejasvi Yadav | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झालेल्या चौकशीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि CBI तसेच मोदी सरकारची देखील खिल्ली उडवली आहे. याआधीही आम्ही सीबीआयला सांगितलं होतं की, तुम्ही दर महिन्याला इथे येण्याची तसदी का घेता. आपले कार्यालय आमच्या घरीच उघडा. तुम्हा लोकांना पुन्हा पुन्हा येथे यावे लागते, त्यासाठी जनतेचा पैसा खर्च होतो. दरम्यान, जमिनीच्या मोबदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयचे पथक बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. राबडी देवी यांची सीबीआयने तब्बल चार तास चौकशी केली.
2 वर्षांपूर्वी