महत्वाच्या बातम्या
-
Delhi MCD Election | भाजपने दिल्ली महापालिका निवडणूका रद्द केल्या | पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला
दिल्ली महापालिका निवडणुकीची मागणी तीव्र करत आम आदमी पक्षाने गुरुवारी मानवी साखळी मोहीम राबवली. यादरम्यान दिल्लीच्या सर्व फ्लायओव्हर्सवर ‘आप’ने ‘भाजपने एमसीडी निवडणुका (Delhi MCD Election) रद्द केल्या, भाजप पराभवाच्या भीतीने पळ काढला’ असे बॅनर लावले. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे एमसीडी प्रभारी दुर्गेश पाठक यांनी सांगितले की, या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट लोकांना जागरूक करणे आहे. एमसीडी निवडणूक रद्द करून भाजपने दिल्लीतील जनतेचा विश्वासघात केला आहे. निवडणूक रद्द करणे हा भाजपचा उद्दामपणा दिसून येतो.
3 वर्षांपूर्वी -
परिस्थिती भयानक | दिल्लीच्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू
देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्ली | ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू, ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉक्टरांचा सोनिया गांधींना हवापालटाचा सल्ला | काही दिवस गोव्यात वास्तव्य
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आज गोव्यात दाखल झाले. दिल्लीतली हवेची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हवापालटाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ते गोव्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी यांना दम्याचा त्रास होतो. त्याच बरोबर छातीमध्ये इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे दिल्लीत्या हवेत आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काही दिवस दिल्लीबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली हायकोर्टाने फटकारले | विरोधक तोंडघशी
दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली हायकोर्टाने चांगलेच फटकारले आहे. दिल्लीत छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनांवर निर्बंध घालण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनावर बंदी घातल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केजरीवाल सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | कार थांबवली आणि | कॉन्स्टेबलचं पिस्तुल काढून झाडली गोळी
दिल्ली पोलीस (Delhi Police) दलातील एका कॉन्स्टेबलचा भयंकर प्रताप समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या मित्राने पिस्तुलीच्या धाक दाखवून भररस्त्यावर तरुणांना मारहाण केली आणि गोळीबार केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (cctv video)समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचाराचं आयसिस कनेक्शन? काश्मीरच्या दाम्पत्याला अटक
अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) या संघटनेशी संलग्नित असलेल्या काश्मीरच्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयएसकेपीच्या संघटनेतील काही लोकांसोबत मिळून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन भडकवण्यामागे या दाम्पत्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका खास मोहिमेअंतर्गत या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Corona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया
मनीष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले, “31 मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद राहतील. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या म्हणजेच शुक्रवार, 6 मार्चपासून लागू होणार आहे. यामध्ये सरकारी, खाजगी, ऐडेड, एनडीएमसी या सर्व शाळांचा समावेश आहे. तसेच, आम्ही सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरससंबंधी सूचना दिल्या आहेत.”
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार: शाहरुखला दिल्ली पोलिसांकडून अटक
दिल्ली हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या शाहरुखला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेशातील शामली इथून शाहरुखला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिल्ली हिंसाचाराच्या दरम्यान थेट पोलिसांवरच शाहरुखने पिस्तुल रोखलं होतं. त्याने तीन राउंड फायर केले होते. शाहरुखची चौकशी सुरू असून तो टिकटॉक व्हिडिओ करायचा तसेच मॉडेलिंगची आवड असल्याचंही समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BSF'च्या जवानाचे घरही दंगलखोरांनी जाळले; सहकारी मदतीला धावले
देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दरम्यान, ही बाब बीएसएफमधील त्याच्या वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांनी या जवानाची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहेत. सदर जवानाचे घर उभारून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे बीएसएफच्या डीजींनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार: गटारे आणि नाल्यांत सापडत आहेत त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह
सलग ३ दिवस हिंसाचाराने होरपळल्यानंतर दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारग्रस्त भागातल्या रस्त्यांवर पडलेले दगड, इतर वस्तू यांची साफसफाई सुरु आहे. दिल्लीची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. काल संध्याकाळी किंवा आज सकाळी हिंसा झाल्याची कोणतीही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. सीएए आणि एनआरसी कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेल्या रविवारी दगडफेक झाली. त्यानंतर ३ दिवस पूर्व दिल्ली पेटत राहिली. या हिंसाचारात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: जमावाने आयबी अधिकाऱ्याला मारून नाल्यात फेकलं होतं; मृतदेह सापडला
दिल्लीच्या चंदबाग भागामध्ये मंगळवारी रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीत इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. नाल्यामध्ये या अधिकाऱ्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी वकिलांना हात जोडून विनंती केली होती तरी...
तिसहजारी कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये डीसीपी मोनिका भारद्वाज आपले हात जोडून वकिलांना शांततेची विनवणी करताना दिसत आहेत, परंतु वकिलांचा कळप अंगावर धावून आला आणि जाळपोळ सुरूच ठेवली. शेकडो वकील डीसीपी मोनिका भारद्वाज आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांना पाठीमागे ढकलताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराचा एक व्हिडिओ कालच समोर आला होता, ज्यात पोलिस अधिकारी मोनिका भारद्वाज काही पोलिसांचं वकिलांपासून संरक्षण करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लोकसभेत राहुल गांधींनी घेतली नरेंद्र मोदींची गळाभेट - व्हिडिओ व्हायरल
आज केंद्रातील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत वेगळंच राजकीय नाट्य अनुभवायला मिळालं. कारण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर तुफान आरोप आणि टीकेच्या फैरी झाडल्या. परंतु, दुसरीकडे ते नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल माझ्या मनात जराही द्वेष नसल्याचं सांगत त्यांनी लोकसभेत थेट पंतप्रधान नरेन्द्र मोदींची गळाभेट घेतली आणि एकच चर्चा रंगली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News