महत्वाच्या बातम्या
-
भाजपाच एक नंबरचा पक्ष | शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही - देवेन्द्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाला जनतेने कौल दिल्याचा दावा केला आहे. राज्यातील ग्रामपंचायच निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच क्रमांक एकचा पक्ष बनला असून गावागावातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जलेबी ना फापडा अशा कार्यक्रमांनी लोकं जवळ येत नाहीत | कृतीतून लोकं जवळ येतात - फडणवीस
मुंबई महानगरपालिकेत भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे. शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधेयकावरून एखाद्या DIG ने राजीनामा देण्याची स्थिती पहिल्यांदाच | फडणवीसांना विसर?
जयस्वाल यांच्या या प्रतिनियुक्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अतिशय कार्यक्षम असे डीजी महाराष्ट्राला लाभले होते. मात्र, डीजींना कुठेही विश्वासात न घेता कारभार चालला आहे. पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे, तो जरी गृहमंत्रालयाच्या अधिकारात असला तरी, त्याची स्वायत्ता आहे. सरकारने सुपरवायझर म्हणून या विभागाकडे काम केलं पाहिजे. पण, लहानातल्या लहान बदल्यांपासून ते अनेक गोष्टीत हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळेच, डीजींना हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे डीजी प्रतिनियुक्ती घेत आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे - फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे आज राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात नाहीत | फडणवीसांचा हिंदी माध्यमांवरून खोटा प्रचार
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी रवाना झाला आहे.महाराष्ट्रभरातील २१ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा या वाहन मोर्चात सहभाग आहे.सभेआधी सोमवारी हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित झाले होते.यावेळी किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी मार्गदर्शन केलं.
4 वर्षांपूर्वी -
आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला मेट्रो करताच येणार नाही - फडणवीस
मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रलंबित आहे. या वादात केंद्राने देखील उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही | राज्य बुडवायला निघालेत - फडणवीस
कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे तरुण आहेत | त्यांनी किमान कांजूरमार्ग कारशेडबाबत सौनिक समितीचा अहवाल वाचावा
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचा या निर्णयामुळं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सभागृहात खटला चालवू नका | गोस्वामींवरील गुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला नाही - अनिल परब
रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,’ असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.
4 वर्षांपूर्वी -
दोघांविरोधात कोर्टात खटले सुरु | तरी फडणवीसांची अर्णव, कंगनासाठी अधिवेशनात बॅटिंग
रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,’ असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजनेची जिल्हानिहाय चौकशी सुरु | 2,417 कोटीची कामं चौकशी फेऱ्यात
फडणवीस सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारला आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना म्हणावी लागेल आणि विशेष म्हणजे यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये देखील अनेक नकारात्मक टिपण्या करण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पडळकरांच्या आडून जाणकरांना बाजूला केलं? | फडणवीसांशी भांडण असल्याचंही मान्य केलं
महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी | फडणवीसांचं टीकास्त्र
‘केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांतील सुधारणांना अनेक विरोधी पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये देखील एपीएमसी व्यवस्था मोडीत काढण्याचं सुतोवाच केलं आहे. परंतु, आता वाहत्या गंगेत हात धुवून घेत सरकारला विरोध केला जात आहे. यात निव्वळ राजकारण असून महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका आहे,’ असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
हैदराबादचं यश दाखवत फडणवीसांकडून कार्यकर्त्यांचं सांत्वन | दाखवलं एकहाती सत्तेचं गाजर
आगामी काळात महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी महाविकास आघाडीने दिली असून, त्याचा पुरेपूर फायदा घेणार असल्याचं मोठं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर शक्यते यश मिळवलं आहे, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद यश दाखवत अप्रत्यक्षरीत्या कार्यकर्त्यांचं सांत्वन केल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला महाविकास आघाडीची ताकद समजली | पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू - फडणवीस
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
नागपूरचा बालेकिल्ला ढासळला | माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदासंघात भाजपाचा मोठा पराभव
पुणे आणि नागपूर पदवीधर हे भारतीय जनता पक्षाचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. काँग्रेसचे वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भारतीय जनता पक्षाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय | फडणवीसांचं टीकास्त्र
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यावेळी १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार (The winter session of the Legislature will be held on December 14 and 15 in Mumbai) आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, १४ आणि १५ तारखेला होणारं दोन दिवसीय अधिवेशन मान्य नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले (Opposition leader Devendra Fadnavis criticized MahaVikas Aghadi Government) आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
सरकार पडले की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील | हे तेव्हा दिसेल - फडणवीस
महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा कोणताही प्रयत्न नाही. हे सरकार एकदिवस महाआघाडीतील अंतर्गत विरोध आणि वादातूनच कोसळेल. मात्र त्यावेळी भारतीय जनता पक्ष एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या एकूण १०५ आमदार असले तरी त्याचे एकूण १५० आमदार कसे होतात, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल’, असे वक्तव्य राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या कार्यकाळात मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं - गृहमंत्री
देशभर वादळ उठवणाऱ्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारवर अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं. तसेच नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा धक्कादायक आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामी यांची बाजू उचलून धरली होती.
4 वर्षांपूर्वी -
त्या मुलाखतीवरून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची 'लायकी' काढली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो