महत्वाच्या बातम्या
-
हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत | फडणवीसांचा खरमरीत टोला
सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या राज्यात पावसाने केलेल्या नुकसानीवरून वाद सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आज (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात फडणवीसांची 'लाव रे तो व्हिडीओ' रणनीती
राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखणेवर मीठ चोळण्याचं काम करु नये,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
हवेतले नेते सत्ता गेल्यावर जमिनीवर | जमिनीवरील नेते नेहमी जमिनीवरच
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी ते गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्या. आशातच, अतिवृष्टीमुळं रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न असतानाच देवेंद्र फडणवीस चिखल तुडवत गावकऱ्यांची भेट घ्यावी लागली.
4 वर्षांपूर्वी -
आज कुठे २-३ तासांसाठी बाहेर आलात | लगेच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत | फडणवीस संतापले
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पावसामुळं रस्ता खचला | चिखलातून वाट काढत फडणवीस गावकऱ्यांच्या भेटीला
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी ते गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. आशातच, अतिवृष्टीमुळं रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न असतानाच देवेंद्र फडणवीस चिखल तुडवत गावकऱ्यांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
टोलवाटोलवी न करता आधी राज्य सरकारने मदतीची घोषणा करावी - फडणवीस
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांविरुद्ध शेतकऱ्याची बॅनरबाजी | फसव्या कर्जमाफीवरून संताप
आस्मानी संकटामुळं जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करतात. प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्न कायमच राहतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याने उद्विग्न होऊन यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस राज्यातील अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करणार | सुरुवात बारामतीपासून
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे येत्या 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना धक्का | जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी
फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यातच दिले होते. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या | NCRB डेटा
भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं थांबले नसल्याची स्थिती आहे. एनसीबीआरनं वर्ष २०१९मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली असून, या आकडेवारीनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील शेतकरी आत्महत्यांच्या क्रमवारीत दुर्वैवानं महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. देशात २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळात महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये राज्य देशात दुसर्या क्रमांकावर होतं - NCRB
महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्यांबाबत नुकताच एक अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) जाहीर केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महिलांसह सलग तीन वर्षांत सर्वाधिक सायबर स्टॉकिंग / धमकावण्याच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.
4 वर्षांपूर्वी -
गरीब रुग्णांचे मृत्यू थांबवा | फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र
‘महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी
शनिवारची संध्याकाळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांना घातलेल्या अटींचाही उल्लेख केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे | कृषी विधेयकावरून फडणवीसांचा टोला
‘शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. त्यांना अनेक मुद्द्यांवर भूमिकाच घेता येत नाही आणि आता तर त्यांना त्यांची सवयही झाली आहे. यात आम्हालाही आता नवल वाटत नाही,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र
शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
युती केली हेच चुकलं | अन्यथा विधानसभाला १५० जागांच्या पुढे गेलो असतो - फडणवीस
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकीताचा संदर्भ देत फडणवीस यांनी युती करून चूक केल्याची कबुली अप्रत्यक्षपणे दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे | फडणवीसांचा टोला
महाराष्ट्र सरकारला आता असं वाटतंय की करोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचं आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील ५० टक्के क्षमता जरी करोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील असंही ते म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीस संतापले | वाद पेटणार
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते | महाराष्ट्र पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पोलिसांबाबत केलेल्या त्या विधानाची आठवण करून दिली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो