महत्वाच्या बातम्या
-
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय योग्य - देवेंद्र फडणवीस
अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देणे हा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले असेल, त्याचे विचार अयोग्य असतील तर आपण त्यावर आक्षेप नोंदवू शकतो. मात्र, त्या व्यक्तीचा जीव आणि मालमत्तेचे संरक्षण करणे, ही राज्य सरकार आणि संवैधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
4 वर्षांपूर्वी -
बदल्या करणं हा एकमेव धंदा राज्य सरकार करतंय | फडणवीसांचा आरोप
राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अजून नियंत्रणात आलेलं नाही. दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना रुग्णांची वाढीचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यात होणारी वाढ कायम असताना तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईतील चाचण्या वाढवा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे - देवेंद्र फडणवीस
सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं - फडणवीस
युजीसी विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात का, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निकाल दिला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारला अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परीक्षा रद्द करता येणार नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या काळातील तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
नांदेडमधील गुरुद्वारा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज - फडणवीस
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास सुप्रीम कोर्टाने सकारात्मक निकाल दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा आहे असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे | देवेंद्र फडणवीस यांचा टोला
आम्हाला सध्या राजकारणापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की, राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाविकासघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. बदल्यासंदर्भात जे काय सुरू आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडून बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस | हाच योगायोग - धनंजय मुंडे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची नाराज अजूनही कायम असल्याचं दिसतंय. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवार आता कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पार्थ प्रकरणात पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांवर केंद्रीय पातळीवर मोठी जवाबदारी मिळणार | बिहार विधानसभा निवडणूक मुख्य लक्ष
महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नातवाच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हे आजोबांनी ठरवायचं आणि नातवाने...
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परिणामी शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत” अशी प्रतिक्रिया देऊन पार्थ पवारांना राजकीय प्रवासात संपूर्ण आयुष्यभर ऐकावं लागेल असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लुटमार | ठाकरे सरकार लूटमार रोखण्यात असमर्थ
एकाबाजूला राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत - फडणवीस
राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूतप्रकरणी ED सुद्धा खटला दाखल करु शकते - देवेंद्र फडणवीस
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी लोकांना वाटते सीबीआय चौकशी व्हावी मात्र राज्य सरकार त्यात आडकाठी करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लिव्ह-इन रिलेशनशीपमधील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल असं वाटत नाही - फडणवीस
“लॉकडाउन की, अनलॉक यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकचं करावं लागेल. कोरोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही”अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीक केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
धाडसी निर्णय घेतले पाहिजेत, पण सरकारची तशी तयारी दिसत नाही - देवेंद्र फडणवीस
“लॉकडाउन की, अनलॉक यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकचं करावं लागेल. कोरोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही”अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीक केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या ई-भूमिपूजनाबाबत MIM आणि मुख्यमंत्र्यांचं मत एकसारखंच - फडणवीस
सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात - फडणवीस
रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती आहे मात्र कुठे जायचं ते मागे बसलेले ठरवतात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर नेमक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. मात्र सामनाला मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतल्या वक्तव्यावरुन त्यांनी टीकाही केली. महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही - देवेंद्र फडणवीस
राज्यातील साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही,” असा टोला लगावत फडणवीसांनी भेटीमागील कारण सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना संताजी-धनाजीसारखे सर्वत्र फडणवीसच दिसतात - प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही - फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती