महत्वाच्या बातम्या
-
आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घातली आहे. तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग', फडणवीसांचा राऊतांना टोला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणाले आहेत. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे. यामुळे कोरोनाच्या लढाई दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नया है वहं..मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? - देवेंद्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही - देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौऱ्यावर कीतीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणी तरी आमची दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, आम्ही राजकारण जनतेकरीता करतो’, असा टोला त्यांनी लगावला.
5 वर्षांपूर्वी -
राऊतांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या - फडणवीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्याही बाजूने, कधी विरोधात काहीही लिहितात, सामनाला स्वत:चा बेस नाही - फडणवीस
‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवार साहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने. त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी बोचरी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजगृह तोडफोड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा, फडणवीसांची मागणी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेविरोधात जनतेकडून, राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राजगृहावर तोडफोड करणाऱ्या माथेफिरूंनी घटनास्थळावरून पळ काढल्याने सध्या पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णांची लूट, रुग्ण व्यवस्थापनही कमतरता, ठाण्यात २-३ रुग्ण बेपत्ता - फडणवीस
ठाण्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मुंबईपेक्षा ठाण्याची परिस्थिती अधिक गंभरी होत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला भेट दिली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राऊतांनी १२ आमदारांची काळजी करण्यापेक्षा कोरोना रुग्णांची काळजी करावी - फडणवीस
संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखावरून रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सरकार अस्थिरेच्या चर्चेनं डोकं वर काढलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास सरकार पाडण्याची तयारी होत असल्याचा धक्कादायक दावा केला होता. सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत, असं राऊत म्हणाले होते. या विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसताना मंत्र्यांसाठी गाड्या प्राथमिकता आहे का? - फडणवीस
मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनला विरोध नाही, पण लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं?
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे. अन्यथा नागरिकांना आणखी मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असा सवाल विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे. सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवायला हवी, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
काय लॉक आणि काय अनलॉक! हे सरकार पूर्णपणे कन्फ्युज - देवेंद्र फडणवीस
राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारचं ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू आहे. त्यामुळे ‘अनलॉक 2’ मध्ये कमालीचा गोंधळ आहे. सरकारच पूर्णपणे कन्फ्युज आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काय लॉक आणि काय अनलॉक आहे, हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे
भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले?...फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह - फडणवीस
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार, सगळा घटनाक्रम डोक्यात - फडणवीस
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत - फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
ट्रॉलिंगसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रचंड फेक अकाऊंट - फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे - फडणवीस
कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून, त्यात राज्यातील एकूण स्थिती मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो