महत्वाच्या बातम्या
-
वादळग्रस्त कोकणी माणसाचे प्रश्न घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले
नुकसानग्रस्तांना तातडीने रोख रक्कम म्हणून मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
मी अनेकदा बारामतीत गेलो, मला तिथेही समुद्र दिसला नाही – फडणवीस
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवस कोकणचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारची १०० कोटींची मदत अत्यंत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
5 वर्षांपूर्वी -
आज ४ वाजता देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची पत्रकार परिषद
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून होत असतानाच राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ही वेळ टीका, आरोप करण्याची नाही; शिवसेनेचं फडणवीसांवर टीकास्त्र
सरकारच्या सूचना व लॉकडाऊनचे नियम धुडकावून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ही वेळ वादविवादाची नाही. टीका, आरोप करण्याची नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे. सरकारी पगार भाजपच्या कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे,’ असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या सिडकोतील 'पारदर्शक' कारभारावर कॅगचे ताशेरे
देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सिडकोमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. कॅगच्या अहवालामध्ये फडणवीसांच्या काळात झालेल्या सिडकोच्या २ हजार कोटींच्या कामावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्का! निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याने फडणवीसांवर खटला चालणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी आता खटला चालणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लीम आरक्षणाला भाजपचा तीव्र विरोध; फडणवीस आक्रमक
मुस्लिम समाजाला महाविकास आघाडी सरकार लवकरच गुड न्यूज देणार आहे. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदे संमत करणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
सिडकोत २५०० कोटींचा घोटाळा; पारदर्शक 'चौकीदारांच्या' कारभारावर कॅगचा ठपका
सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाळा १ लाख भरून मोकळ्या होतील, या कायद्याचा काहीच उपयोग नाही: फडणवीस
आज ‘मराठी भाषा दिन’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. त्यानुसार राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय सक्तीचा होणार आहे. मराठी भाषा सक्ती करण्याबाबतचं विधेयक विधानपरिषदत एकमतानं मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर विधानसभेत देखील सहमत झाला. दरम्यान आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
आधी सावरकरांना भारतरत्न द्या; महाविकास आघाडीकडून भाजपची विकेट
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखली होती. मात्र ती रणनीती भाजपवरच पलटली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी त्या ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर फडणवीसांचे काय होईल? - शिवसेना
भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC: महाविकास आघाडीत धुसफूस, पण फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणाले; जलयुक्त शिवार योजना सरकार बंद जरूर करेल....पण
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही, मग आम्हाला सुसंवादासाठी का बोलावलं: फडणवीस
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना नागपूर न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फडणवीस हे आज न्यायालयात उपस्थित झाला. १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नागपुरातील २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता. त्यामुळे ते कोर्टात हजर होते.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या ‘त्या करोडो वृक्ष लागवडीचे’ महाविकास आघाडीकडून चौकशीचे आदेश
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी'ची मागणी: देवेंद्र फडणवीस
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल: देवेंद्र फडणवीस
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? - फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY