महत्वाच्या बातम्या
-
पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही: देवेंद्र फडणवीस
दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
काहीच वाच्यता न करता भाजपने अप्रत्यक्षरीत्या काही सहकारी पक्ष नेत्यांसकट हॅक केले? सविस्तर
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
5 वर्षांपूर्वी -
भाजपने कामंच केली नसल्याने महाजनादेश यात्रेत मोठा पोलिस बंदोबस्त: खासदार डॉ. अमोल कोल्हे
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाथरी येथील राष्ट्रवादीच्या यात्रेत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदवीची देखील यावेळी अमोल कोल्हेंनी खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळालं. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाजानदेश यात्रेवर देखील अमोल कोल्हे यांनी भाष्य करत फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश नाही तर 'महाबोलबच्चन यात्रा'
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाथरी येथील राष्ट्रवादीच्या यात्रेत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदवीची देखील यावेळी अमोल कोल्हेंनी खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळालं. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाजानदेश यात्रेवर देखील अमोल कोल्हे यांनी भाष्य करत फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.
5 वर्षांपूर्वी -
पत्नीच्या हट्टापायी सरकारी बँकेला डावलून पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती AXIS बँकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून AXIS बॅंकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फडणवीस आणि राज्य सरकारवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या AXIS बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकाकार्त्याने आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
एक हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज माफ: सरकारची घोषणा
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. तर शेतजमीन देखील नापीक झाली आहे. तसेच शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिक वाहून गेली आहेत. त्यामुळे सरकारने एक हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी काही पिकं घेतली आहेत, त्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
८ ऑगस्ट पुरग्रस्तांसाठीची मंत्रिमंडळाची बैठक; अन सपना मुनगंटीवार विश्वस्त असलेल्या तिरुपती देवस्थान ट्रस्टवर खैरात
मुंबई : श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
5 वर्षांपूर्वी -
भोसरी जमीन प्रकरण खडसेंना भोवलं; पण तिरुपती देवस्थान जमीन प्रकरणी काय होणार? - सविस्तर
श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी लावलेला हाऊसफुल्ल बोर्ड हटवून हे भाजप नेते पुन्हा भरती सुरु करणार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वाटेवर असताना कोकणातील दोन-तीन आमदार भाजपात येण्यास उत्सुक असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांना जनसमुदायात मान्यता आहे, अशा लोकप्रतिनिधींनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच रंगणार, याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षात काहीच राहिलं नसेल तर प्रत्येक जण वाट शोधतो, अशीच काहीशी परिस्थिती एनसीपीची झालेली आहे, असे म्हणत त्यांनी एनसीपीवर जोरदार टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम
श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण शहर घोषणेचे ६५०० कोटी ५ वर्ष वेटिंगवर; आता पूरग्रस्तांसाठी ६,८०० कोटींची घोषणा
पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त संकटातून बाहेर आले नसताना फडणवीसांच्या 'महा इव्हेन्ट' यात्रा सुरु होणार
कोल्हापूर, सांगलीतील पूर आता ओसरू लागला असला, तरी तेथील जनजीवन अजून पूर्ववत झालेले नाही. पुराच्या पाण्यासोबत शेकडो संसार वाहून गेले आहेत. अन्नधान्य, भांडीकुंडी, कपडे, शैक्षणिक साहित्य यांची वाताहत झाली आहे. प्रसारमाध्यमांतून दाखवले जाणारे भीषण वास्तव पाहून मुंबईकरही हेलावला आहे. म्हणूनच मुंबईच्या विविध भागांतून गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था, समूह, विद्यार्थी संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अलमट्टी धरण: २००५ मध्ये आबां'नी जे धाडस दाखवलं ते फडवीसांना जमलंच नाही, अन्यथा?
मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
६५०० कोटीचे कल्याण: फडणवीसांच्या स्मार्ट सिटीचा रोड की उत्तर भारतीयांच्या म्हशींचा तबेला?
मागील २ दिवसांपासून ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे कल्याण आणि नजीकच्या शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. पावसामुळे रात्री घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कर्जत लाईनवर तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात पटरीवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंड करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता बांधकाम कामगारांना मिळणार अवघ्या ५ रुपयात जेवण
कोणतीही इमारत किंवा प्रकल्प उभा करायचा असेल तर यात अत्यंत महत्वाची भूमिका असते ती म्हणजे बांधकाम कामगारांची. याच कामगारांना आता अटल आहार योजनेअंतर्गत अवघ्या पाच रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. अटल आहार योजना क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने हि योजना गुरुवारी सुरु झाली. कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारांची महत्वाची भूमिका असते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO पुरावे: ईव्हीएमवर जी शंका राज ठाकरे आणि विरोधकांनी घेतली, ती भाजपला देखील
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे: फडणवीस
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूकीआधी सरकार धनगर समाजावर खुश!
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना आता राज्य सरकार सर्व समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असताना तसंच धनगर समाजाचा रोष टाळण्यासाठी राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती मिळणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याआधी मराठा समाजाला देखील आरक्षण देऊन खूश केलं आहे. आता राज्य सरकारने आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सवलती धनगर समाजाला देखील मिळतील असा निर्णय घेऊन धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राणेंच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते; मुख्यमंत्र्यांची मात्र टाळाटाळ
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी ‘नो होल्ड्स बार्ड’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार होते. मात्र, पुस्तक प्रकाशनाला ते टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे राणेंच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. १६ ऑगस्टला या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY