महत्वाच्या बातम्या
-
खबरदारीचा उपाय म्हणून विनोद पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण वैध आहे, अपवादात्मक स्थितीत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं, असं स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण कायद्यावर काल शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण कमी करून १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. या निकालावर, मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे देखील सांगितलेय. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सातत्याने कायदेशीर बाजू लढणारे मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज्यात मोठा चारा घोटाळा, भाजप-सेना समर्थकांचा सरकारी खजिन्यावर दरोडा: स्टिंग ऑपेरेशन
राज्याला मागील ३ वर्षांपासून सतत दुष्काळाची झळ बसली आहे. दुष्काळ आणि जलसंकटामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती आणि जनावरं देखील संकटात आली आहेत. तीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर चारा-छावण्या उभ्या केल्या आहेत. मात्र सत्तेचा दुरुपयोग आणि मिळालेल्या नैसर्गिक संधीचा गैरफायदा घेत भाजप आणि शिवसेना समर्थक एनजीओ चारा छावण्यांच्या पडद्याआड सरकारी तिजोरीवर अक्षरशः दरोडे टाकत असल्याचं वृत्त आहे. इंग्रजी वृत्त वाहिनी इंडिया टुडेने संबंधित स्ट्रिंग ऑपरेशन करत राज्यातील चारा घोटाळ्याची पोलखोल केली आहे. या स्ट्रिंग ऑपेरेशनमध्ये हा घोटाळा बिहारमधील चारा घोटाळ्याप्रमाणेच असल्याचा दावा करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: भाजप तब्बल ३०-३२ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करणार?
मागील ५ वर्षांत ज्या आमदारांनी सातत्याने ग्राम पंचायतींपासून महापालिकांपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षासाठी असमाधानकारक कामगिरी, लोकसभा निवडणुकीतील आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी महत्वाच्या निकषांवर भारतीय जनता पक्षाच्या तब्बल ३० ते ३२ विद्यमान आमदारांना लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील अनेक विद्यमान आमदारांचे धाबे दणाणले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भिडेगुरूजी व शिवप्रतिष्ठानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास पोलिसांकडून बंदी
संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. पालखी सोहळ्यात कुणी देखील घुसू नये आणि शिस्तीचं पालन व्हावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास यावेळी परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी स्पष्ट नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली
सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आजच्या एका धक्कादायक कबुलीने शिवसेनेने अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण राज्यातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून देखील शिवसेनेने म्हणजे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिलेल्या कबुलीने खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेसाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” आणि ”अब कि बार २२० पार” अशी घोषवाक्ये तयार करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात ही रथयात्रा निघणार आहे. मात्र हेच तंत्र आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत आलेल्या वायएसआर काँग्रेसने तेथिल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २-३ महिन्यापूर्वी राबविले होते. यावेळी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातून देखील ही रथयात्रा काढण्याची रणनीती आखली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे शेवटच्या शनी स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शिवसेनेला शह दिला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राज्यात ३ महिन्यात ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यावर्षीच्या जानेवारी ते मार्च ३ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सहकार आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. यामधली १९२ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. ज्यापैकी १८२ प्रकरणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. दरम्यान एकूण ९६ प्रकरणं निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आली. तर ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत अशी देखील माहिती देशमुख यांनी सभागृहाला दिली. सदर विषयाला अनुसरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी लक्ष वेधले होते ज्यावर देशमुख यांनी सभागृहाला हे उत्तर दिले.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: हेल्मेट सक्तीतून पुणेकरांकडून मोठा दंड वसूल केल्यावर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
यावर्षी १ जानेवारीपासून पुण्यात पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी निदर्शनं आणो कोर्टकचेऱ्या देखील झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या कालावधीत पुणे वाहतूक पोलिसांनी पूणेकरांकडून रग्गड दंड देखील वसूल केला. मात्र विधानसभा निवडणूक केवळ ३-४ महिन्यांवर आल्याने या विषयाला अनुसरून पुणेरकरांचा रोष सहन करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अखेर हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; दुष्काळावर विशेष चर्चा
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर काल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
एसआरए घोटाळ्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून डच्चू?
अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल सकाळी अकरा वाजता पार पडला. यात एकूण तेरा आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. १३ मंत्र्यांना सामावून घेताना फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आधीच्या एकूण ६ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे हे सहाही मंत्री भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या १०, शिवसेनेच्या २ नेत्यांना तर आरपीआय आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना मंत्रिपपदाची शपथ देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस व एटीएस'मधील वाद चव्हाट्यावर; आयुक्तांकडून 'त्या' अधिकाऱ्यांना अभय की?
मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्यातील चढाओढ आणि वादविवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. देवेन भरती यांनी एटीएस प्रमुख पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या ठिकाणी बदलीसाठी थेट महासंचालकांकडे अर्ज करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील १२ धडाकेबाज अधिकाऱ्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस बॉम्ब टाकल्याने खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दल म्हटलं की पाहिलं डोळ्यासमोर येतं ते शिस्त, मात्र अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे खुलेआम नियमांचे उल्लंघन करणे ही बाब पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी अत्यंत गंभीरपणे घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी संबंधित १२ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
युतीत पुन्हा रुसवे फुगवे! राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार १४ जून म्हणेजच उद्या होणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत सध्या मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु आहे. त्यामुळे, हा मंत्रिमंडळ आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसा आग्रहच पक्षाच्या अनेक नेत्यांकडून आणि आमदारांकडून केला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री फक्त भाजपाचाच असेल; बैठकीत निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
इंद्रायणी नदीत प्रदूषणाने हजारो मासे मृत अवस्थेत; रिव्हर अँथम वैयक्तिक चोचल्यांसाठी
संत तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीत प्रदूषणामुळे हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. केवळ १५ दिवसांवर आषाढी वारी आली असताना असे प्रकार घडू लागले आहेत. अशातच एवढ्या मोठ्याप्रमाणात मृत मासे आढळल्याने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि निसर्ग प्रेमिंनीसुद्धा नद्यांच्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला आहे. ‘रान जाई’ या समाजसेवी संस्थेचे सदस्य रविवारी सकाळी ७ वाजता जलपर्णी काढण्यासाठी आले असता, त्यांना हे मृत मासे आढळून आले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मृत मासे काढण्याच काम सुरू होते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुक: दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्य भाजपची बैठक
लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात बैठकांचे जोरदार सत्र सुरु झाले असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. सदर बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्ष संपली, विधानसभा आल्या; आता मुख्यमंत्र्यांकडून मराठवाडा दुष्काळमुक्तीची भाषा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा दौरे सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून आणि ३-४ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने त्यांच्याकडून पुन्हा मतदाराला आणि विशेष करून दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या मराठवाड्याला पुन्हा मृगजळ दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते म्हणाले ‘सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे, परंतु आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'तो' निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वर्ग केले आहे असा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास लावून घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अब्दुल सत्तार भाजपात आल्यास औरंगाबाद भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता
काँग्रेसचे सिल्लोडमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यावरून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत हस्तक्षेप होण्याची शक्यता असून स्थानिक नेते मंडळी नक्की काय निर्णय होतो त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY