महत्वाच्या बातम्या
-
फक्त जाहिरातबाजी? राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषितच
काही महिन्यांपूर्वी ‘मुंबई रिव्हर अँथम’ गाण्यातील जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका सुद्धा करण्यात आली होती. कारण, केवळ जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारकडून प्रत्यक्ष नद्यांच्या प्रदूषणात घट करण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काहीच होताना दिसत नाही. त्याच्या पुरावा आता समोर आला आहे. कारण, जाहिरातीत स्वतःची चमकोगिरी करून, प्रत्यक्ष जमिनीवर लोकांच्या तसेच स्थानिकांच्या प्रबोधनासाठी काहीच होताना दिसत नाही.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेच अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार: अशोक चव्हाण
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने जोरदारपणे तयारीला लागा असे आदेश अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारच्या प्रतिनिधींकडून माध्यमांना खोटी माहिती, जनतेची दीशाभूल करत आहेत
मागील तब्बल आठवड्याभरापासून अण्णा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, सरकारतर्फे भेटण्यास येणारे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट झाल्यावर प्रसार माध्यमांना खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत अण्णांनी कालच्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी जंगल के शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली: फडणवीस
सारी जनावरे एकत्र येऊन कळप केला, तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत, मोदी वाघ आहेत, शेर तो जंगलका शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली होते है, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी देशभरातील विरोधी पक्षांवर विखारी टीका केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला आज सकाळी स्थानिक पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. दरम्यान, पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांचे वजन उपोषणाच्या चौथ्या दिवशी साडे तीन किलोने घटले
आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्याच्या वजनात तब्बल साडेतीन किलोची घट झाली आहे. अण्णांच्या वयाचा विचार करता ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही असं डाक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मोदी सरकार अण्णांच्या उपोषणाची जराही दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतल्याचे कळते.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणवर, मोदी सरकारची डोकेदुखी वाढली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस साहेब! अशाच कामगिरीचा सल्ला मोदींच्या गुजरात भाजपला सुद्धा द्यायचा होता
काल मुंबई सांताक्रूझ येथे भव्य ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युपीचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान, उपस्थित उत्तर भारतीयांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले.
6 वर्षांपूर्वी -
आमच्या सरकारमुळे उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार बंद: फडणवीस
युपी ही जन्मभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वनवासातील चौदा वर्षे नाशिकच्या पंचवटीत व्यतीत केली. त्यामुळे यूपी आणि महाराष्ट्राचे हजारो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. तसेच राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार वारंवार घडत. मात्र, मागील साडेचार वर्षे आमच्या सरकारच्या कामगिरीमुळे त्यांना कोणी सुद्धा धमकावले नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केला.
6 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्वाचे निर्णय
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणेकरांना सुद्धा विशेष शैक्षणिक भेट दिली आहे. कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय निश्चित करण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं कर्तव्यावरील पोलिसाला चिरडलं
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं थेट कर्तव्यावरील पोलीस शिपायाला चिरडून मारल्याची धक्कादायक घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा म्हणजे ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे राज्यात तस्करांच्या वाढत्या मुजोरीचं वास्तव समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं: उद्धव ठाकरे
बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात वेटरची १३ पद आणि ७००० अर्ज, राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र
भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार
राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे कोर्टाचे आदेश
राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य शिवस्मारक. परंतु, आता त्याच शिवस्मारकाचे काम थांबवण्यात यावे असे थेट आदेश महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अहो मोठा-भाऊ लहान-भाऊ नाही, ते प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे: प्रकाश आंबेडकर
शिवसेना आणि भाभारतीय जनता पक्ष यांच्यातील भांडण हे पती पत्नीचं नाही तर प्रियकर प्रेयसीचं यांच्यातील आहे अशी बोचणारी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत दिली आहे. नाशिकला बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
6 वर्षांपूर्वी -
BEST संप: लोकांना वेठीला का धरता? उच्च न्यायालयाने कामगारांना सुनावलं
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग ७व्या दिवशीसुद्धा सुरूच असल्याने सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरुच आहेत. दरम्यान, या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
6 वर्षांपूर्वी -
BEST संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थोड्याच वेळात बैठक
BEST कामगारांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांच्या समस्या संपण्याचं नाव घेत नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग ७वा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा केल्यानंतर सुद्धा लेखी आश्वासन मिळेपर्यंत BEST कामगार संघटना अजून माघार घेण्यास तयार नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
पुढील जन्मी अदानी-अंबानी होईन असे वाटल्याने पतीची आत्महत्या, या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज यवतमाळ येथे सुरुवात झाली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या वैशाली येडे यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी उपस्थितांशी आणि समस्त महाराष्ट्राशी भावनिक संवाद साधला आणि व्यवस्थेचे वास्तव प्रत्येकासमोर ठेवले असेच म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
सावित्रीबाई फुले विद्यापीठ; पदवीदान समारंभात ‘पगडी’वरून गोंधळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात पगडीवरून प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पदवी प्रदान समारंभातील पुणेरी पगडीला उपस्थित विद्यार्थी संघटनांनी मोठा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण, विद्यापीठाच्या आजच्या पूर्वनियोजित पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून त्यात पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY