महत्वाच्या बातम्या
-
2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल - देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजप चंद्रकांतदादांना पदावरून हटवणार? | भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीवर फडणवीसांनी दिली माहिती
पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची देखील चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस अडचणीत? | राज्यातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? | हायकोर्टाचा सवाल आणि हे निर्देश...
महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगासस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि जस्टिस जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी, डीजीआयपीआर आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस, राज्य सरकार सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारकडून पुरग्रस्तांची फसवणूक? | फडणवीसांकडून आकडेवारी देत 'हा' गंभीर आरोप
काल राज्य सरकारने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली. त्यापैकी तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी, पुनर्बाधणीसाठी तीन हजार कोटी, तर बाधित क्षेत्रात दीर्घकालीन उपायांसाठी सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार ते दीड लाख, तर दुकानदारांना ५० हजारांची नुकसानभरपाई मिळणार आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या मदतीवरून टीका केल्याचे दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
बीडीडी चाळ पुनर्विकास | सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट? | आली प्रतिक्रिया
शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास सहा महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही - देवेंद्र फडणवीस
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | 2019 मध्ये मंदिरात आश्वासन देणारे फडणवीस आता त्याच मंदिरात २०२१ मध्ये प्रकटले | नागरिकांनी झापले
2019 मध्ये ज्या दोन गावांना महाप्रलयाचा फटका बसला. त्याच आंबेवाडी आणि चिखली गावाला यावर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला आहे. 2019 मध्येही अनेक मंत्री, नेते गावात येऊन नागरिकांना आश्वासन देऊन गेले. अनेकांना मदत मिळाली तर काहींना मिळाली नाही. त्यामुळे यावेळी गावात महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांच्या शब्दांचा मार सोसावा लागला.
3 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन केलं आहे. ते राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत, मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत. आजच्या दिवशी हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
स्वप्निल लोणकर कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड | धनादेश सुपूर्द
एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.
3 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजना | 1 हजार कामांतील भ्रष्टाचार रडारवर | ई-टेंडर शिवाय अनेक भाजप कार्यकर्त्यांना ठेकेदारी
फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झालेल्या १००० कामांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होणार आहे. विजयकुमार समितीने आपल्या अहवालात ही शिफारस केली असून उर्वरित १२८ कामांची विभागीय चौकशी करावी, असेही समितीने राज्य सरकारला सुचवले आहे. अनेक कामे ई-टेंडर न काढता करण्यात आली. काम न करता देयके अदा केली.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचं शुटिंग सुरू होतं | ठाकरे सरकारने हाणून पाडलं - नाना पटोले
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न फिल्म शूटिंग करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. मुंबई अशाप्रकारे पॉर्न फिल्म शूटिंग होत असल्याच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलीवूडसह राज्यभरात खळबळ माजली आहे. मात्र पॉर्न फिल्मची शूटिंग ही राज्यात तात्कालीन देवेंद्र फडणीस सरकार आल्यापासून सुरू होतं, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस रडारवर? | कॅगने ठपका ठेवलेल्या जलयुक्त शिवार योजनेची ACB मार्फत चौकशीची शिफारस
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ACB मार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांणा उधान आलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही बातमी काहीसी धक्कादायक असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री लादले | त्याच राज्यांमध्ये पक्षाचं नुकसान | भाजपा नेत्याचा घणाघात
देशातील सर्वोच्य पदावरील जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशाह म्हणतात’, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील माजी आमदार आणि कट्टर वसुंधरा राजे समर्थक नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे. ‘आपण कुणालाही घाबरत नाही. जे चुकीचे आहे, त्याविरोधात बोलू कारण यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादलं. जिथे जिथे नेते लादण्यात आले, तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं’, अशा शब्दात शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला.
3 वर्षांपूर्वी -
बदनामीसाठी चाईनीज फंडिंग घेत असल्याचा फडणवीसांचा माध्यमांवर आरोप | PM केअरने चायनीस फंडिंग घेतल्याचा विसर?
फोन टॅपिंगच्या मु्द्दयावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. पण केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
3 वर्षांपूर्वी -
Pegasus Hacking | फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा - काँग्रेस
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस चक्क पुण्याचे शिल्पकार? | धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त - आ. मिटकरी
पुण्यातील काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा होत होती. समाज माध्यमांवर त्यांच्या होर्डींगचा फोटोही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका होर्डिंगवरून ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मनसेबाबत चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही | पण योग्यवेळी निर्णय घेऊ - फडणवीस
नागपूरला परतलेल्या फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही | त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही | फडणवीसांच्या या विधानाचा अर्थ काय?
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांच्यात आणि फडणवीसांदरम्यान सर्वकाही ठीक नसल्याचं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं होतं. त्यातून भाजपामध्ये त्यांच्या विरोधात अंतर्गत धुसफूस असल्याचं देखील अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट झालं आहे. तसेच मला नाराजी व्यक्त करायची असेल तर ही जागा देखील कमी पडेल असे म्हटल्याने त्यांच्या भविष्यातील बंड करण्याच्या शक्यता देखील निर्माण झाल्या होत्या. मात्र आता फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर त्यात भर पडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड प्रकरण | न्या. झोटिंग समिती अहवालात खडसेंविरोधात ठपका? - सविस्तर वृत्त
भोसरी (पुणे) एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला ‘ईडी’ने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंसंदर्भातील न्या. झोटिंग समितीच्या अहवालात खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका समोर आला आहे. खडसेंवर भूखंड खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला होता. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर खडसे यांना ४ जून २०१६ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
3 वर्षांपूर्वी -
अजब सोमैय्या | आधी राणेंच्या बेहिशेबी मालमत्तेची फडवणीस, मोदींकडे तक्रार | आता राणेंकडे इतरांची तक्रार
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. नारायण राणेंच्या भेटीसाठी सोमय्या दिल्लीत आले होते. या भेटीत त्यांनी कोकणातील मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट्स, बंगले बेकायदेशीर बांधकाम आणि त्यावर कारवाई संबंधी चर्चा केली. स्वत: सोमय्यांनी याबाबतचं ट्विट करुन ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो