महत्वाच्या बातम्या
-
OBC जनतेची दिशाभूल करणाऱ्या फडणवीसांची पोलखोल | SECC डेटा बद्दल चुकीची माहिती दिली होती
सामान्य लोकांना आकड्यांची सत्यता समजू नये किंवा लोकांना त्यातील सत्य माहित समजत नसल्याचं दुसरं सत्य फडणवीसांना माहित असल्याने ते अनेकदा चुकीची माहिती खरी असल्याप्रमाणे कांगावा करत असतात. लोकांच्या अज्ञानाचा ते पुरेपूर फायदा उचलत कोणत्याही विषयात फिरवून, फुगवून आकडेमोड माध्यमांसमोर मांडतात आणि खोटं आभासी अभ्यासू व्यक्तिमत्व माध्यमांच्या मार्फत मांडत असतात. त्यात ते गोंधळाचं वातावरण निर्माण करून केवळ राज्य सरकारविरुद्ध संभ्रम निर्माण करण्याचं कौशल्य सातत्याने वापरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी त्यांची इंधनाच्या करांवरून केलेल्या आकडेवारीवरून पोलखोल केली होती. आता अजून एक पोलखोल झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलवरील कर आकारणी | मोदींच्या बचावासाठी फडणवीसांकडून आकड्यांच्या टोप्या? | अशी केली पोलखोल
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. मात्र दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही. असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करामधील १२ रुपये राज्यांना मिळतात त्यामुळे राज्य सरकारने आधी स्वत:कडे बघण्याची आवश्यकता आहे,’ असे फडणवीस काल पुण्यातील पुण्यात म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंग प्रकरण | त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन
फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
अमित भाईंकडे काही गोष्टी गेल्यानंतर अनेकांना कापरे भरते - देवेंद्र फडणवीस
अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे भगिनींचे राजकारण अजून खडतर | नाराजी नाट्याच्या प्रश्नावर उत्तरावेळी फडवणीस संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. बुधवारी 43 जणांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये 36 नवे चेहरे सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे 12 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तर महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रीतम मुडेंनाही स्थान मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र प्रीतम मुडेंना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड 2018 | फडणवीसांच्या काळातील सर्वात मोठ्या शासकीय धान्य घोटाळ्यात CID नंतर ED'ची उडी
फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी जमीन क्लीनचिट प्रकरण | फडणवीसांची प्रकरण दडपण्याप्रकरणी ED'ने चौकशी का करु नये? - काँग्रेस
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री-गृहमंत्री होते फडणवीस | राज्यातील आमदार-खासदारांच्या फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
राज्यात भारतीय जनता पक्षाच सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भारतीय जनता पक्षाला भोवण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारने खोटी स्टोरी रचली | फडणवीसांचा गंभीर आरोप
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. परंतु, पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरा-समोर आले. तसेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. विरोधक आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला. या गैरवर्तनानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी फडणवीस अडचणीत | समर्थकाला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजुरी | कोर्टात याचिका
विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैव्यवहारावरून आधीच नागपुरातील वकिलाने गंभीर आरोप करतांना न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने देखील जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारावरून एसआयटी नेमली आहे आणि त्यामुळे देखील भविष्यात फडणवीस अडचणीत येऊ शकतात. मात्र आता त्यात अजून एक भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अजित पवारांविरोधात ठराव मांडण्यापूर्वी मोदी-शहा आणि फडणवीसांची भेट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही | तुमको ना भुल पायेंगे - आ. अमोल मिटकरी
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | २-३ महिन्यात? OBC समाजाने प्रथम फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षणाचं दिलेलं हे वचन ऐकावं
माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला हाणला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
तिसरी लाट | मुलांची काळजी घेण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या सूचना | नागपूर भाजपकडून लहान मुलं आंदोलनात
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
4 वर्षांपूर्वी -
पोलखोल | ओबीसी राजकीय आरक्षणात कपात करण्याचा अध्यादेश फडणवीस सरकारने २ ऑगस्ट २०१९ ला काढला होता
भाजपने सध्या ओबीसी आरक्षणावरून राज्यात आंदोलन उभी करत महाविकास आघाडीवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता फडणवीसांच्या काळातील मोठी पोलखोल झाली आहे. राज्यातल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने २ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला होता आणि त्याबाबतचा अध्यादेश जारी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राज्यात सरसकट 27 टक्के आरक्षण दिले जाते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही चौकट पाळताना सरकारने 31 जुलैला अध्यादेश जारी करत ओबीसींच्या आरक्षणात कपात करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाला कोर्टात विरोध करणारे अनुप मरार भाजपचे पदाधिकारी कसे? | उत्तर न देता OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? असे प्रश्न
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस बरळले | म्हणाले, यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलेच्या लैंगिक शोषणामुळे राजीनामा देणारे आ. जारकिहोली फडणवीसांच्या भेटीला | म्हणाले फडणवीस माझे गॉडफादर
कर्नाटकातील विवादित आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकिहोली यांनी आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश जारकिहोली म्हणाले की, मला पुन्हा मंत्री बनण्यात रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाने मला जो सन्मान दिला आहे तो काँग्रेसमध्ये मला २० वर्षात कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडती नौका आहे त्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षात परतण्याचा विचारही करत नाही. मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत होतो परंतु वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तुर्तास हा निर्णय घेत नाही असं त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी पर्याय देऊ - फडणवीस
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने ओबीसींचा इम्पेरीयल डेटा सुप्रीम कोर्टात न दिल्याने राजकीय आरक्षण रद्द | फडणवीसांनी केंद्राकडून तो डेटा आणावा
सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ओबीसी आरक्षणाच्या याच मुद्द्यावर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झालं, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC