महत्वाच्या बातम्या
-
महाविकास आघाडी सरकार सुद्धा पडणार असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांना मुडेंचं प्रतिउत्तर
मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जवानांच्या नावाने निवडणुका; पण मोदी'राज्यात सैनिकांना पुरेसं अन्न-वस्त्र सुद्धा नाही: कॅग रिपोर्ट
सियाचीन, लडाख, डोकलामसारख्या उंच ठिकाणच्या सीमा रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या जवानांना आवश्यक वस्तू, खाद्यपदार्थ मिळत नसल्याचा ठपका कॅगने केंद्र सरकारवर ठेवला आहे. संसदेच्या पटलावर कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यात ही बाब समोर आली. कॅगचा हा अहवाल २०१७-१८ या वर्षातील आहे.
5 वर्षांपूर्वी -
भगवान गडावर पोहोचले मंत्री धनंजय मुंडे; पंकजा मुंडेंना टोला
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जातील. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलावलं होतं. आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडेंचा देखील मंत्रिमंडळात समावेश निश्चित
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून पाडलेली छाप आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 30 हजारांहून अधिक मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षाकडून कॅबिनेट मंत्रिपद निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबईत आज होणाऱ्या शपथविधीसाठी परळीसह जिल्ह्यातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास असेल. सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार असून धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून रीतसर निरोप आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
'पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल' - आ. धनंजय मुंडे
मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. २७ जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे'... आ. धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
गोपीनाथ मुंडेंची गुरुवारी जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच जोरदार शक्तिप्रदर्शन करून पंकजा मुंडे पुढील डावपेचांची आखणी करणार हे नक्की.
5 वर्षांपूर्वी -
परळीत फक्त धनंजय मुंडे! महाविकास आघाडीच्या परळीत पहिल्या सरपंच
परळी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केल्यानंतर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे अजून स्थानिक पातळीवरील राजकीय धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. मात्र, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे येथील स्थानिक सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे देखील सरकारने मागे घ्यावे: आ. धनंजय मुंडे
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र (NCP MLA Dhananjay Munde wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Bhima Koregaon Riots).
5 वर्षांपूर्वी -
बीड भाजप'मय करणार होत्या; आज स्वतःच आमदार कसं व्हायचं या पेचात अडकल्या पंकजा?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील वाद मुख्यमंत्रीपदाच्या निमित्ताने विकोपाला गेला. मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्तास्थापनेच्या घडामोडी वेग घेऊ लागल्याचं पाहायला मिळालं. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी अंमलात आली असली तरी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाशिवआघाडी सत्तास्थापन करेल अशी शक्यता अधीक आहे. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सोशल मीडिया स्टेटस देखील बदलल्याने भाजपच्या अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत हे स्पष्ट आहे.
5 वर्षांपूर्वी -
जिंकलो असलो तरी घरातील माणसाचा पराभव झाल्याने मनात खंत: धनंजय मुंडे
परळीत पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, मी पराभव स्वीकारत असून आपल्या वडिलांनी पराभव कसा खांद्यावर घ्यायचा हे शिकवलं असल्याचं त्या म्हणाल्या.
5 वर्षांपूर्वी -
परळीतून धनंजय मुंडे ६००० मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडेंची धाकधूक वाढली
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा म्हणाल्या होत्या 'राम कदम तसा नाही' मग धनंजय मुंडे तसे कसे वाटले? चर्चा रंगली- सविस्तर
पंकजा मुंडे यांनी भाजपाचे आमदार ‘राम कदम तसा नाही’ असे विधान केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना धारेवर धरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना ‘मग राम कदम कसा आहे’ हे महाराष्ट्राला सांगा असे आव्हान केलं होतं. पंकजा ताई तुम्ही महिला आहात, महिला व बालकल्याण खाते सांभाळता. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून तुम्ही मोठ्या आहात, मी तुमच्या एवढी मोठी नाही. पण मग तुम्ही राबवत असलेली बेटी बचाव मोहीम आहे की बेटी भगाव असा प्रश्न जेव्हा तुम्ही राम कदम यांची बाजू घेता तेव्हा पडतो. मग तुम्ही महिलांच्या मंत्री आहात की राम कदम यांच्या असा खोचक सवाल त्यावेळी सक्षणा सलगर यांनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
बहिणाबाईंच्या कविता आम्ही ऐकल्या आहेत; या शब्दात यातना होण्यासारखं काय आहे? शरद पवार
बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनींमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. ‘धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई बोलल्याचं मी ऐकलंय. त्यात वावगं काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखं येण्यासारखं काय आहे,’ असा टोला पवारांनी हाणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नव्याने दाखल झालेले भाऊ निवडणुकीसाठी मला खलनायक सिद्ध करण्याच्या प्रयत्नात: धनंजय मुंडे
ग्रामविकास मंत्री आणि आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध केल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन, असे म्हणत आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा उलट आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. राखी बांधणाऱ्या बहिणीबाबत मी कधीही खालच्या थराला येऊन असले विधान करणार नाही, मात्र नव्याने दाखल झालेले भाऊ मला खलनायक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून माझे समाजातील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुंडे म्हणाले. या मागे जो कुणी असेल त्याला शोधून काढण्यासाठी आता आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.
5 वर्षांपूर्वी -
खणा-नारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा: रुपाली चाकणकर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून देखील विजयी होण्याचे दाखले देण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या जवळपास ४० जागांवर विरोधकांशी तगडा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे जवळपास ६ मंत्री सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतमोजणी केंद्राजववळ जॅमर बसवून मोबाईल टॉवर बंद ठेवा: धनंजय मुंडे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून देखील विजयी होण्याचे दाखले देण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या जवळपास ४० जागांवर विरोधकांशी तगडा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे जवळपास ६ मंत्री सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राणे म्हणतात वाघाची शेळी-मेंढी झाली; तर धनंजय मुंडे म्हणतात ही कुत्र्यासारखी अवस्था
विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडताना दिसत आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राजकारणात शिवसेनेची अवस्था ही कुत्र्या सारखी झाली आहे, एक गोष्ट सांगून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा पाकिस्तान द्वेष मतांसाठी; नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? - धनंजय मुंडे
नाशिमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हरकत घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आधीच दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्योगपतींवर आत्महत्येची वेळ; हे 'मेड इन इंडिया' की 'डेड इन इंडिया'? - धनंजय मुंडे
मागील २ दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News