महत्वाच्या बातम्या
-
धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून २ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील हाय कोर्टाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याला देखील स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना गजाआड टाकण्याची सत्ताधारी पक्षांची खेळी फासल्याची चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.
6 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष संपला असेल तर दुष्काळाकडे वळा आता : धनंजय मुंडे
काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले असून त्यात पुन्हा भाजपचं सत्तेत येईल असं म्हटलं आहे. त्यांनतर भाजप आणि भाजप समर्थक निवडणूक जिंकल्यासारखा जल्लोष करण्यात मग्न आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते मंडळी देखील संतापली आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर; दुष्काळाने होरपळलेल्या जनतेशी संवाद साधणार
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणी देखील करणार असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी ईडीला घाबरुन औरंगजेबास मुजरा घातला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? ईडीला घाबरुन तुम्ही औरंगजेबास मुजरा घातला. अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
6 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांनी १०६ कोंटींचा मोबाईल घोटाळा केला: धनंजय मुंडे
ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि फडणवीस बेस्ट कपल, केवढा तो एकमेकांवर जीव: धनंजय मुंडे
आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेकजण स्वतःच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फाडावीसांना खोचक टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा: धनंजय मुंडे
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत EVM हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या धक्कादायक दाव्यामुळे देशातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी रॉ किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, अशी मागणी एनसीपीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यावर दुष्काळाचं सावट तर मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी २ कोटी खर्च
सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे आणि राज्याच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट असताना केवळ गर्दी जमविण्यासाठी आणि प्रोमोशनसाठी राज्य सरकारकडून मोदींच्या शिर्डीमधील कार्यक्रमावर तब्बल २ कोटीची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. नियोजित ठिकाणी २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन सरकारकडून करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
कमला मिल अग्निकांड प्रकरणी लक्षवेधी
कमला मिल अग्निकांड प्रकरणी लक्षवेधी
7 वर्षांपूर्वी -
'लक्ष्यवेधी' सेटलमेंट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा : सत्ताधारी
सत्ताधाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत ‘लक्ष्यवेधी’ सेटलमेंट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा अशी मागणी विधानसभेत केली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA