Dhanuka Agritech Share Price | शेअर असावा तर असा! धानुका एग्रीटेक शेअरने 34000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
Dhanuka Agritech Share Price | शेअर बाजारात असे खूप कमी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती केले आहे. धानुका अॅग्रीटेक या अग्रगण्य कृषी रसायन निर्माता कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव असला तरी या कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत लोकांना करोडपती केले आहे. दीर्घ कालावधीत अवघ्या 34,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर धानुका अॅग्रीटेक कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 11 टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी धानुका अॅग्रीटेक शेअर 1.85 टक्के घसरणीसह 707.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी