Insurance E-Policy | नवीन नियम, तुमच्या सर्व विमा पॉलिसी डिजिटल स्वरूपात ठेवणे आवश्यक, काय सांगतो नवीन नियम समजून घ्या
Insurance E-Policy | IRDAI ने विमा कंपनीना विनंती केली आहे की, जी ग्राहकाने थेट इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून पॉलिसी खरेदी केलं तर त्यांना सवलत द्यावी. या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वाबाबत 20 ऑक्टोबरपर्यंत भागधारकांकडून सल्ला आणि टीप मागवण्यात आली आहे. IRDAI ने नुकताच ई-पॉलिसी जारी करण्याच्या विद्यमान नियमांवर विचारमंथन केले होते आणि त्यात काही बदल सुचवले होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या मसुद्यात IRDAI ने स्पष्ट केले आहे की, विमा व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा यासाठी हे नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये आता पॉलिसी धारकला विमा कंपनीमार्फत फिजिकल फॉर्मसोबतच ई-फॉर्मही दिला जाईल.
IRDAI ने आपल्या प्रस्तावात म्हंटले आहे की वर्ष विमा कंपनी यापुढे आपल्या विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करतील. पॉलिसी ची ऑफर ई-मोडद्वारे प्राप्त झाली असेल किंवा ऑफलाईन, विमा कंपनीला पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक रुपात जारी करावी लागेल. विमा एजंटमार्फत थेट प्राप्त झालेला ई-प्रस्तावही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे मंजूर करण्याचे बंधन IRDAI विमा कंपनीवर घातले आहेत. सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांची माहिती भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारावी लागेल.
2 वर्षांपूर्वी