महत्वाच्या बातम्या
-
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’...जगाची उत्सुकता वाढली
सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त असून सगळयांचे लक्ष करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमधील वादाला चीन जवाबदार..अमेरिकेची प्रतिक्रिया
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून कठोर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. शिवाय, सध्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चीनलाच जबाबदर धरण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत, परिस्थिती अत्यंत कठीण आहे - डोनाल्ड ट्रम्प
गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमधील घडामोडींवर अमेरिकेचे लक्ष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत. परिस्थिती अत्यंत कठीण आहे.’
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अमेरिकेची प्रतिक्रिया
लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे हजारो मृत्यूमुखी आणि श्वेतवर्णीय हिंसक आंदोलन; ट्रम्प यांना निवडणुकीत पराभवाची चिंता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की या महिन्यापासून ते आपली निवडणूक सभा सुरू करणार आहेत. दरम्यान त्यांनी चर्चेत असलेल्या सर्व आशंका फेटाळून लावल्या आहेत. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर कार्ययालय सोडून निघून जाईन.
5 वर्षांपूर्वी -
उच्च शिक्षित भारतीयांचं अमेरिकेत नोकरीच स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प घेणार मोठा निर्णय
भारतात आयआयटी करून बहुतांश विद्यार्थी अमेरिकेला जातात. उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अनेक भारतीय तरुण, तरुणी पाहतात. मात्र आता हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच-१बी (H1-B) व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याच्या विचारात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताने चाचण्यांची संख्या वाढवल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळतील - ट्रम्प
अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ३६ हजार १८४ जणांना, तर चीनमध्ये ८४ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतानं आतापर्यंत ४० लाख जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत हिंसाचार सुरुच, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित ठिकाणी
कोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेकडून चीनची जोरदार आर्थिक कोंडी, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले निर्बंध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे जागतिक तणाव निर्माण झालेला असताना महाशक्ती बनण्यासाठी मोठमोठे देश शस्त्रांस्त्रांचे भांडार उभे करण्यात व्यस्त आहेत. चीनमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच चीनने समुद्राचे २००० किमी क्षेत्रफळ बंद केले असून ७० दिवसांचा युद्धसराव सुरु केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरीच्या चुकीने डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स उघड
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींची एक चूक झाली आणि सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स समजले. करोना व्हायरसचा कहर जगभरात पसरला आहे. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या वातावरणात आता ट्रम्प यांच्या नावाची चर्चा पुन्हा होते आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोकऱ्यांवरून अमेरिकेत पुन्हा 'अमेरिकन फर्स्ट'चा नारा; डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट
चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे. मात्र आता अमेरिकेला मोठ्या बेरोजगारीचा सामोरं जावं लागणार असल्याने ट्रम्प सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना चिंता: अमेरिका आणि स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
जगभरात कोरोनाने कहर केला आहे. या व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेसह जगभरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि वाढता संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या व्हायरससोबत लढण्यासाठी ट्रम्प यांनी 5 हजार कोटींची तरतूद केली आहे. या आधी कोरोनाचा सामना करण्यासाठी स्पेनमध्येही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी गरिबी झपाट्याने कमी केली? ट्रम्प यांचं विधान खोटं; काय आहे MPI रिपोर्ट? - सविस्तर
अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. भारतीयांच्या क्षमतेवर भाष्य करताना ट्रम्प यांनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भाजपची २० वर्ष सत्ता; पण आधुनिक शाळांसाठी मेलेनिया ट्रम्प दिल्लीला: सविस्तर वृत्त
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्याबरोबर दिल्लीतील सरकारी शाळांच्या दौऱ्यात आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सहभागी होणार नाहीत. केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव कार्यक्रमातून हटवल्याचा आरोप आपमधील सूत्रांनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: मोटेरा स्टेडिअमच्या बाहेरील गेटमधून ट्रम्प आत जाणार होते; तो गेटच कोसळला
देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष या स्टेडिअममध्ये येणार आहेत. मात्र, आज एक धक्कादाय़क घटना घडली आहे. या स्टेडिअममध्ये ज्या गेटमधून ट्रम्प जाणार होते ते तात्पुरते उभारलेले गेटच कोसळले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सीआयए सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेलेनिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळांना भेट; केजरीवाल व सिसोदियांना वगळले
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येणार असल्याने अहमदाबाद पासून ते आगरा पर्यंत जोरदार तयारी करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील रस्ते सुद्धा सजवण्यात आले आहेत. तर मोटेरा स्टेडिअम येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. याच दरम्यान शुक्रवारी अहमदाबाद विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे. तर आज विमानतळाच्या बाहेर मॉक ड्रिल सुद्धा झाले. ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची सुरक्षितता पाहता अहमदाबाद विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दोन दिवसांची सुट्टी २४-२५ फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. पोलिसांना हे कर्मचारी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान मदत करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा गुजरात दौरा; भारत म्हणजे फक्त गुजरात नाही: राष्ट्रवादी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘हाऊडी मोदी’प्रमाणे ‘नमस्ते ट्रम्प’ असा कार्यक्रम होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समितीच्यावतीने ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करावे, याचे सर्व अधिकार हे अयोजन समितीकडेच असल्याची माहिती देखील रवीश कुमार यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी भारतासोबत व्यापार करार अशक्य: ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले. कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रवेश मिळावा तसेच अन्य उत्पादनांवरील टॅक्स कमी व्हावा यासंबंधी ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात करार व्हावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही यामध्ये यश मिळालेले नाही.
5 वर्षांपूर्वी -
व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही: डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON