महत्वाच्या बातम्या
-
देशात दुसरा सक्षम अधिकारीच शिल्लक नाही का? ईडी संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यावरून सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं
Supreme Court slams on ED Chief Appointment | सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजयकुमार मिश्रा यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या मुदतवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. ‘एखादी व्यक्ती इतकी अपरिहार्य असू शकते का?’, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला विचारला.
2 वर्षांपूर्वी -
ED Vs Xiaomi | शाओमी कंपनीचा ईडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी कॉर्पने तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक गुन्ह्यासंदर्भात चौकशीदरम्यान धमकावण्यासह जबरदस्ती आणि शारीरिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. चीनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ४ मे रोजी तक्रार दाखल केली. रॉयटर्सने कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Anandrao Adsul Vs ED | चौकशीनंतर आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात | तब्येत बिघडल्याने इस्पितळात दाखल
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र काही वेळातच ईडी कार्यालयात कागदपत्र देऊन गोरे आणि निंबाळकर हे बाहेर पडले आहे. बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी ते ईडी कार्यालयात आले होते, याची अद्यापही माहिती मिळू शकली नाही.
4 वर्षांपूर्वी -
ईडीकडून खडसेंची मालमत्ता नक्की जप्त झाली? | महसूल विभागालाही माहिती नाही? - काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने जोरदार दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते? | ED भाजपच्या इशाऱ्यावर नाचतंय - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीने काल DCP डॉ. राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला | आज अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी | काय कारण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका | 9371 कोटींची संपत्ती जप्त
भारतात बँकिंग घोटाळ्याच्या घटनांमध्ये सरकारी कारवाईचे परिणाम दिसून येत आहेत. अंमलबजावणी संचालनालयने बँकिंग घोटाळ्याचे फरार आरोपी विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदीची एकून 9371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. ईडीने ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA