महत्वाच्या बातम्या
-
SSC HSC Exams | परीक्षा संदर्भात शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 57,074 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले असून या आकड्यांची तुलना इतर देशांशी केल्यास महाराष्ट्राची संख्या भारत आणि फ्रान्स देशाच्या ही पुढे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे १०वी आणि १२वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी | सरावासाठी प्रश्नसंच इथं ऑनलाईन उपलब्ध
दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी , बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यासाठी, विद्यार्थ्यांची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंजिनिअर व्हायचंय? | बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE ) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
MBBS Final Year Exam | ८ मार्चपासून परीक्षा ऑफलाईनच होणार
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून MBBS अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | 8 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 21.36 कोटी परत
दुष्काळ आणि नैसर्गिक संकट आदींमुळे राज्यातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची शुल्क माफी करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले, त्यांना त्यांची रक्कम ही परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांची बँक खाती अथवा इतर काही पर्याय आहेत, याचीही माहिती घेऊन ती परत केली जाणार असल्याचे मंडळाकडून कॉप्स या संस्थेचे पदाधिकारी अमर एकाड यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर | शिक्षण मंत्र्यांची माहिती
कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. परंतु, यावर देखील मात करुन यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, मात्र काहीशा उशिराने घेतल्या जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज अधिकृतपणे जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्राध्यापिका रोहिणी गोडबोलेंना फ्रान्स सरकारचा मानाचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट' पुरस्कार
फ्रान्स सरकारने भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यातिका रोहिणी गोडबोले यांचा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा बहुमानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मूळच्या पुण्याच्या असणार्या रोहिणी गोडबोले यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांसोबत मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अॅमेझॉन अॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, अॅमेझॉन इंडियाने अॅमेझॉन अॅकॅडमी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री, लाइव्ह लेक्चरद्वारे जेईईसाठी नियमित तयारी करवून घेतली जाईल. तसेच गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचे विस्तृत मूल्यांकन उपलब्ध करुन दिले जाईल. अॅमेझॉन अॅकॅडमीची बीटा आवृत्ती व्हीबँड आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल.
4 वर्षांपूर्वी -
GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड
भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं मुंबई आयआयटीतर्फे आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत १६२ खासगी इंग्रजी शाळा बेकायदा | ऍडमिशन पूर्वी माहिती घ्या
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील २०६ बेकायदा शाळांची यादी नुकतीच जाहीर केली. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ बेकायदा शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. बेकायदा शाळा तातडीने बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पालिकेने शाळा प्रशासनाला दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSC-HSC Exam Result | दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या
महाराष्ट्र राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
4 वर्षांपूर्वी -
SSC Exam | ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर
एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. (SSC Board Exam 2021 online form date declared my Maharashtra SSC board)
4 वर्षांपूर्वी -
ICAI CA Exam | चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 13 तारखेला | वेळापत्रक
ICAI CA Examination 2020. इंस्ट्यिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडिया (ICAI) यांनी सीए परीक्षेसाठी (CA Examination 2020) अॅडमिट कार्ड जाहीर केले होते. तर आता येत्या 8 डिसेंबरला चार्डेड आकआउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 (Chartered Accountants Foundation Examination paper 1) पार पडणार होता. मात्र तो पेपर आता येत्या 13 तारखेला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० | सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा पुरस्कार
शाळा ही पहिली गुरू आहे असं म्हणतात. शिक्षक शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला घडवतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील (Solapur ZP school teacher Ranjeet Singh Disle won Global Teachers award 2020) शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी (7 crores Prize) रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MHT CET Result 2020 | सीईटी निकालात टॉपर्स संख्येत वाढ
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MHT-CET परीक्षेचा निकाल शनिवारच्या रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आला. सदर निकालात PCB Group १९, तर PCM Group २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ८५ पर्यंत पर्सेंटाइल मिळवणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या PCM Group २६ हजार ५०२, तर PCB Group मध्ये एकूण ३२ हजार ७९६ विद्यार्थी इतकी आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षे वेळी सर्व्हर डाउन नव्हे | तो नियोजनबद्ध सायबर हल्ला
शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 17 ऑक्टोबरपासून होत असून एकूण 50 हजार 417 विद्यार्थी ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला | विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
पहिली प्रवेशासाठी जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलला | मुख्याध्यापकांचा तो अधिकारच काढला
राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे. आता ३० सप्टेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश घेता येईल.(Age cut-off date relaxed for nursery, Class 1 admissions in Maharashtra) याचा अर्थ असा की ३१ डिसेंबरआधी मूल सहा वर्षांचे झाले तर त्याला पहिलीत प्रवेश मिळू शकेल. प्रवेशासाठी पुढील वर्षाच्या जूनपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. याच निकषावर नर्सरी, प्ले स्कूल, बालवाड्या यांचेही प्रवेश होतील. सर्व बोर्डांना हा नियम लागू आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो