Eiko Lifesciences Share Price | मल्टिबॅगर Eiko लाईफसायन्स शेअर्सच्या गुंतवणुकदारांना राइट्स इश्यूचा लाभ मिळणार, स्टॉक तपशील जाणून घ्या
Eiko Lifesciences Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही Eiko लाईफसायन्स शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी लवकरच राइट्स इश्यू जाहीर करणार आहे. 28 जून रोजी कंपनी Eiko लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 3.61 टक्क्यांच्या घसरणीसह 61.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 101 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 35.25 रुपये होती. Eiko लाईफसायन्स कंपनीचे बाजार भांडवल 50.96 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी Eiko लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी