महत्वाच्या बातम्या
-
काल फडणवीस नाथाभाऊंच्या घरी गेले होते, आज नाथाभाऊ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले
एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये राष्ट्रवादीला नंबर वन करणार | राष्ट्रवादी संवाद यात्रेत खडसेंची गर्जना
राज्यात संवादाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सुचना याव्यात आणि त्यातून राष्ट्रवादीच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी संपूर्ण राज्यातील संघटना बळकट करत आहे. तसेच संघटना आणि पक्ष यांच्यातील संवाद वाढावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. प्रत्येक तालुका-जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सलोखा निर्माण करून राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान सध्या जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा जळगावात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात पक्ष मेळावे | खडसेंपुढे भाजपच्या संकटमोचकांची संकटं संपेना
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील जाहीर प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जोरदार पदाधिकारी मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा पक्ष मेळावा पार पडला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोहिणी खडसेंना तिकीट देणं ही भाजपची खेळी | खडसेंचा दावा
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने माझं तिकिट कापलं.. मी रोहिणीताईंसाठी तिकिट मागितलं नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक त्यांना तिकिट दिलं गेलं. त्यानंतर त्यांना पाडण्यासाठी भाजपातल्याच काही गद्दारांनी काम केलं असाही आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षांतर करा असं मला माझे कार्यकर्ते कायमच सांगत होते. तुम्ही अन्याय सहन करु नका, तुमचा अपमान होतो आहे तो तुम्ही सहन करु नका असं मला कार्यकर्ते सांगत होते. मात्र मी चाळीस वर्षे पक्षात होतो त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार नव्हता. मला विनाकारण मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या रिट्विटमध्ये थेट मोदींवर निशाणा | भाजपाच्या राजकीय गळतीचे संकेत
भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. कारण जयंत पाटील यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासोबत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकेल: भाजप नेते एकनाथ खडसे
सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाहीत, पण क्लीनचीट'साठी मुख्यमंत्र्यांकडे 'वॉशिंग पावडर'
भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या भरतीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ धुवून घेतो. पक्षात आल्यानंतर क्लीन चिट देतो. नंतर ते कामाला लागतात, अशी शेलक्या शब्दात खडसे यांनी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिंदेंना उत्तर भारतीयांची अनधिकृत दुकानं फोडल्याचे ज्ञात, पण मराठी माणसाची डोकी फोडल्याचा विसर?
काळाच्या ओघात शिवसेना मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठी गृहीत धरलेला पारंपरिक मतदार झाला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. भाषणात मराठी माणसाचा एकही उच्चार न करता, त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात आहे: आनंद परांजपे
एनसीपीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ठाणे शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि एनसीपीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे सुभाष देसाई यांच्या विरोधात खडसेंचा हक्कभंग
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा हक्कभंग नोटीस दिली असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भोसरी जमीन गैरव्यवहाराबाबत सरकारला चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप खडसेंनी नोंदविला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे
ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल