Multibagger Stocks | गुंतवणूकदार दीड वर्षात झाले मालामाल, या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 49 लाख रुपयाचा परतावा दिला
Multibagger Stocks | ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीनं आपला आयपीओ गेल्या वर्षी आणला होता. कंपनीचे शेअर्स 102 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर वाटप करण्यात आले होते. 9 एप्रिल 2021 रोजी हे शेअर्स 140 रुपयांच्या किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. जुलै 2022 मध्ये कंपनीने आपल्या भागधारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.12 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1724.05 रुपयांवर जाऊन बंद झाले होते.
2 वर्षांपूर्वी