महत्वाच्या बातम्या
-
Video Viral | कायद्याची परवा न करता अशा आमदारांना रस्त्यात तुडवा | बाळासाहेबांच्या त्या आदेशाचा व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40च्यावर आमदार फोडत गुवाहाटी येथून सवता सुभा मांडण्याची गणिते मांडत आहेत. दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह घेण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे गटातील 12 आमदारांचे निलंबण करण्याची तयारी उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी कारवाई करणार असल्याचे सांगताच एकनाथ शिंदे गटाकडून तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
MahaVikas Aghadi | कायदेशीर प्रक्रियेवर जोरदार हालचाली | घटनात्मक बाजू काय सांगते?
राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना नेमकं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे प्रभारी राज्यपाल नवीन मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील. बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. प्रभारी राज्यपालांच्या देखरेखेखाली या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mandakini Khadse in ED Office | मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात, पण ED कार्यालय बंद
पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. परंतु, ईडीचे कार्यालय बंद असल्याने त्यांनी परत (Mandakini Khadse in ED Office) जावे लागले. पण त्या पुन्हा येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्या तपास यंत्रणेत पूर्ण सहकार्य करतील, अशी माहिती मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन तळेकर यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
Non Bailable Warrant Against Eknath Khadse | मंदाकिनी खडसें आणि एकनाथ खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. मंदाकिनी खडसेंनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने (Non Bailable Warrant Against Eknath Khadse & Mandakini Khadse) फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणी एकनाथ खडसे हे आजही सत्र न्यायलयात हजर होऊ शकले नाही.
3 वर्षांपूर्वी -
Tarbuj of Maharashtra | सर्व एका टरबूजामुळे झाले | तो कोण ते गुगलवर जाउन टरबूज ऑफ महाराष्ट्र सर्च करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे एका स्थानिक कार्यक्रमानंतर पुन्हा चर्चेत आहेत. जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना (Tarbuj of Maharashtra) त्यांनी ‘हम तो डूबे है सनम तुमको भी लेकर डूबेंगे’ अशा शायराना शैलीत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच आपण ईडीला घाबरत नाही ईडीचा विषय आता संपला. प्रकरण कोर्टात असल्याने कोर्टाला मात्र घाबरतो असे खडसे यांनी म्हटले आहे
3 वर्षांपूर्वी -
Eknath Khadse Vs BJP | हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे - एकनाथ खडसे
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर (Eknath Khadse Vs BJP) निशाणा साधला आहे. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.
3 वर्षांपूर्वी -
Khadse Vs Girish Mahajan | त्यांचे जावई कारागृहात, पत्नीवर आरोप | त्यांना हायड्रोफोबिया झालाय - महाजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचे नाव न घेता मास्तरांचा पोरगा एक हजार कोटींच्या संपत्तीचा मालक कसा झाला? याची चौकशी करा, अशी मागणी केली होती. आता यावरून गिरीश महाजन (Khadse Vs Girish Mahajan) यांनी टोला लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil | खडसेंनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये अन्यथा...
जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil) यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे ‘एखादा शूटर लावून मला मारून टाका’ अशी मागणीच पाटील यांनी केली आहे.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला.
3 वर्षांपूर्वी -
भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न
महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात बनावट पद्धतीने खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये अवैधरीत्या वळवले. याच पैशांचा वापर जमीन खरेदीसाठी झाल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
जमीन खरेदीत गैरव्यवहार | हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते | ED कोर्टाचं निरीक्षण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
3 वर्षांपूर्वी -
ED प्रकरण | राज्यपाल नियुक्त आमदारकीला आढकाठी होण्याची शक्यता?
राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 आमदारांचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विषयावरून राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे सध्या याच विषयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपमधून ते नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. त्यानंतर त्यांचे राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून नाव देण्यात आले आहे. विधानपरिषदेमार्गे त्यांना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत खडसेंचे नाव दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या अडचणीत वाढ | ईडीकडून एक हजार पानी आरोपपत्र दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह त्यांच्या जावयाची मालमत्ता ईडी'कडून जप्त
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसलाय. ईडीने गुरुवारी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी तर शुक्रवारी खडसेंची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. एएनआयने आणि काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
जळगाव | आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीची सेना-राष्ट्रवादीत खलबतं?
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात राज्यातील दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल | प्रकृती स्थिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये भाजपाला अजून एक दणका मिळणार? | माजी उपमहापौर राष्ट्रवादीच्या वाटेवर
जळगाव शहर मनपातील भारतीय जनता पक्षाचे एक बंडखोर नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या बंडखोर नगरसेवकाचा राष्ट्रवादी प्रवेश हा विधानसभा निवडणुकीची तयारी समजला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
क्लीन चिट देऊनही फडणवीसांनी झोटिंग अहवाल विधानसभेत सादर का केला नव्हता? | अनेक प्रश्न उपस्थित
सरकार आणि प्रशासकीय पातळीवरील धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. मात्र सदर प्रकार फडणवीसांच्या कार्यकाळातील असल्याने मध्य शंका उपस्थित होतं आहेत. त्यामुळे समोर येतं असलेल्या प्रकारामागे अदृश्य हात कोणाचे असे प्रश्न उपस्थित होउ लागले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील खडसेंना क्लीन चीट देणारा झोटिंग समितीचा अहवाल गायब? | ते अदृश्य हात कोणाचे?
सरकार आणि प्रशासकीय पातळीवरील धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. मात्र सदर प्रकार फडणवीसांच्या कार्यकाळातील असल्याने मध्य शंका उपस्थित होतं आहेत. त्यामुळे समोर येतं असलेल्या प्रकारामागे अदृश्य हात कोणाचे असे प्रश्न उपस्थित होउ लागले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
जळगावात कुछ बडा होने वाला है नंतर, मी नाथाभाऊ समर्थक कॅम्पेन जोरात
BHR प्रकरणाची सूत्रे जोरात फिरू लागताच आ.गिरीश महाजन गटाकडून ‘कुछ बडा होनेवाला हैं’ असे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. आठवडाभरात एकनाथराव खडसेंच्या मागे ईडी लागली आणि खडसे समर्थक मैदानात उतरले. खडसे समर्थकांकडून जोरदार सोशल मिडिया कॅम्पेन केले जात असून ‘मी नाथाभाऊ समर्थक’चे वॉलपेपर व्हायरल केले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने | मला आणि माझ्या कुटुंबियांना छळण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसे
भाजपातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामागे ईडीची चौकशी लागणार हे जवळपास एकनाथराव खडसेंना माहितीच होते. गुरुवारी खडसेंना चौकशीकामी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते तत्पूर्वी ते १० वाजता पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी बॉम्बगोळा टाकणार असल्याची चर्चा होती परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळविण्यात आले. नेमक्या रात्रभरात काय घडामोडी घडल्या की खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली मात्र ईडीच्या चौकशीला ते सामोरे जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना