महत्वाच्या बातम्या
-
BHR घोटाळ्यात महाजन गटाचे भवितव्य अंधारात येताच ED कारवाईला वेग? | खडसे गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत होते?
भाजपातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामागे ईडीची चौकशी लागणार हे जवळपास एकनाथराव खडसेंना माहितीच होते. गुरुवारी खडसेंना चौकशीकामी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते तत्पूर्वी ते १० वाजता पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी बॉम्बगोळा टाकणार असल्याची चर्चा होती परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळविण्यात आले. नेमक्या रात्रभरात काय घडामोडी घडल्या की खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली मात्र ईडीच्या चौकशीला ते सामोरे जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले
पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली | ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी
भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडीकडून खडसे यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ईडी कार्यालयात हजर राहण्याआधी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालावली असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळ्याची चौकशी वेगाने पुढे सरकली अन खडसेंच्या कुटुंबावर सापळा पडला? | नाथाभाऊ CD लावणार?
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी जमीन प्रकरण | खडसेंनी पदाचा गैरवापर केला नसल्याची फडणवीसांच्या काळात क्लीन चिट... मग?
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी'कडून अटक
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं सांगून फडणवीस व चंद्रकांतदादा आमदारांना थोपवत आहेत
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ | सरकार स्थापन करायला तळमळत आहेत - खडसेंची टीका
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत.
4 वर्षांपूर्वी -
खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध
केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंकडून महाजनांच जळगावातील साम्राज्य खालसा करण्याची तयारी | जिल्हा परिषदही धोक्यात?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने जळगाव महानगरपालिकेत भाजपाला धूळ चारत स्वतःचा महापौर बसवला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जोरदार धक्का दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेगाने हातपाय पसरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? | हायकोर्टाचा ईडीला सवाल
भारतीय जनता पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर, त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला विचारला आहे.एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्यानंतर पुढील सुनावणीवर बोलत असताना न्यायालयाने पुन्हा एकदा खडसेंना दिलासा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड प्रकरण | फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा - अंजली दमानिया
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कथित सहभाग असलेल्या भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात विशेष न्यायालयाने साक्षीदार म्हणून विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच भोसरी भूखंड भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी झोटिंग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंकडून लोटसचं ऑपरेशन | तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला जबर दणका दिला आहे. भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही ED लावली | आता माझ्याकडून सीडी लावण्याचं काम बाकी | जामनेरमध्येच इशारा
भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डरकाळी फोडली आहे. सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड प्रकरण | हायकोर्टात पुढील सुनावणी येत्या सोमवारी 25 जानेवारीला
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करु नये यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंनी लोटसचं ऑपरेशन सुरु करताच दिल्ली भाजप सतर्क | धाडली ED नोटीस
भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली असल्याचे वृत्त आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, खडसे यांनी मात्र आपल्याला अद्याप अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसे काय थांबेना | भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकरच राष्ट्रवादीत
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. आता भाजपला आणखी एक बसण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (BJP MLA from Khandesh will soon join NCP party through Eknath Khadse)
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजप आमदाराच्या पोश्टरवर खडसे | लवकरच राष्ट्रवादीत?
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगावात विस्तार करण्याचं वचन त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या संकट मोचकांना म्हणजे गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला होता. कारण जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
वाजपेयीनीं ३२ पक्षांचा ट्रक ५ वर्षे चालवला | तशी ३ पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा पण चालेल
शरद पवार हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आणण्याचा चमत्कार केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ३२ पक्षांचा ट्रक ५ वर्षे यशस्वीपणे चालवला. मग ३ पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा का चालणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असा ठाम विश्वास देखील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला
4 वर्षांपूर्वी -
BHR Scam | खडसेंकडून गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर | बड्या व्यक्तींचा नामोल्लेख टाळला
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले आहेत. झंवर हे हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो