महत्वाच्या बातम्या
-
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं वृत्त | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदाच भाष्य
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार SIT | तो तर फडणवीसांच्या चौकशीच्या आवाहनाला सरकारचा प्रतिसाद - खडसे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. ही योजना अपयशी असल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषदेच्या ४ जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात | नाथाभाऊंचा नंबर नक्की?
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा एकनाथ खडसेंचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानूसार, उदेसिंग पाडवी म्हणाले की, एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठरलं! नाथाभाऊंसोबत मोठे पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार | थेट विधानपरिषदही मिळणार?
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ती चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांद्वारे मिळत आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या हालचालींमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचा अलर्ट | महाजनांच्या घरी बैठक
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं वरिष्ठ नेत्याविरुद्ध राजकारण | आता खडसे भाजपाला राजकीय धक्के देण्यास सज्ज
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी आमदार पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश माझ्या आदेशानेच | खडसेंचं वक्तव्य
माजी आमदार उदयसिंह पडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो माझ्या आदेशावरुनच असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उदयसिंह पडवी यांनी मला विचारलं होतं की कोणत्या पक्षात प्रवेश करु तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपाला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर खडसे पवार भेटीच्या वृत्तावर स्वतः शरद पवारांनी खुलासा केला
पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे आज बुधवारी मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांच्या भेटीच्या शक्यतेचा खडसे यांनी इन्कार केला असला तरी राजकीय गोटात खडसेंची मुंबईवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे | उघड केल्यास अनेकांना हादरा बसेल | खडसेंचा गौप्यस्फोट
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यांनी त्यांच्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीस संतापले | वाद पेटणार
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' पुस्तक लिहिणार | अनेक गोष्टी उघड करणार
विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल खडसे यांनी केला असून, लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंवर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला | त्यांनी शिवसेनेत यावं - अब्दुल सत्तार
भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनात येण्याची खुली ऑफर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. यावेळी बोलताना सत्तार यांनी खडसेंना बाहुबलीची उपमा दिली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी अजितदादांसोबत ३ दिवस सरकार चालविले | त्यामुळे ते त्यांना लक्ष करणार नाहीत
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभा प्रचारात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन जनतेला आवडलं की नाही - एकनाथ खडसे
भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात एकाकी पडल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारी समितीमध्ये देखील त्यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात मागील काही काळात त्यांना भाजपच्या राज्यांसंबंधित निर्णयात सामील देखील करून घेतलं जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्रात जस मोदी आणि अमित शहा यांचा आवाज चालतो, तसा राज्यात फडणवीस यांचा आवाज चालतो असं भाजपच्या अंतर्गत गोटात देखील छुप्या आवाजात मान्य केलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
खा. श्रीकांत शिंदेची अँब्युलन्स सेवा | वडील PWD मंत्री | गाडी टोल कंपनीच्या नावावर
राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने कल्याण-डोंबिवली मनपाला ९ रुग्णवाहिका, उल्हासनगर मनपाला ८ रुग्णवाहिका, अंबरनाथ नगरपरिषदेला ५ रुग्णवाहिका आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेला ५ रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते लोकर्पण करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
वीज बिल झटका | सामान्य ग्राहक, नेते मंडळी ते सेलिब्रेटी अशी सर्वांचीच लूट
महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता वाजले की बारा; भाजपने खडसेंच बंड तात्पुरतं शमवलं अन राज्यसभेला पुन्हा गुंडाळलं?
महाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून गुरुवारी त्याने नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला ३ जागा येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भेट
भारतीय जनता पक्षामधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून फडणवीस व महाजनांनी माझ्या विरोधात डाव आखला
स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच मला विधानसभेचं तिकीट नाकारतानाच माझ्या मुलीचाही पराभव घडवून आणला गेला, असा थेट आणि खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेऊन आरोप केल्याने भारतीय जनता पक्षामध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस गेले अन संवेदनशील गृहमंत्री येताच बंदोबस्तावरील पोलिसांना आयुक्तालयातर्फे १० रु. थाळी
नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त गृहखात्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने केला आहे. गोंडराजाचा पुतळा असलेल्या विधानसभा चौकात पोलिसांनी बुफे पद्धतीने जेवण वितरीत केले. हे जेवण अवघ्या १० रुपयात सर्व पोलिसांना देण्यात आले. जेवणाचा दर्जा कसा काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय जातीने हजर होते. त्यांनी पदार्थांची चव चाखून समाधान व्यक्त केले. त्यांनी स्वत: पोलिसांना जेवण वाढले देखील.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल