महत्वाच्या बातम्या
-
खातेवाटप....ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोपीनाथजींनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही: एकनाथ खडसे
गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भारतीय जनता पक्ष नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. गोपीनाथ गडावर दिवंगत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे यांचं फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र
२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्वावरून कुरघोडी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सर्व प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेस अपयश आल्यानंतर नाराज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये मोठी फूट पडणार; राजकीय भूकंप करत नरेंद्र-देवेंद्र या एकाधिकारशाही विरुद्ध बंड?
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ४० मिनिटे विधानभवनात भेट घेतल्याने खडसे नक्की काय करणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, उद्या, १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्यासह आपणही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाला विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हेदेखील उपस्थित राहणार आहेत. खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असून भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देताना फडणवीसांना लांब ठेवण्यात आलं आहे. तसेच पक्षातील तिकीट नाकारण्यात आलेले सर्व नेते उद्या गोपीनाथ गडावर हजर राहणार असल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री असूनही फडणवीसांनी ५ वर्षांत स्व. गोपीनाथ मुंडें'चं स्मारक उभारलं नाही
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली; सोबत ओबीसी समाजाचे नेते देखील
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाथाभाऊ पक्षात आले तर आम्हाला आनंदच : बाळासाहेब थोरात
नाथाभाऊ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलेले नाही. अशी माणसे पक्षात आली तर आम्हाला आनंदच होईल. पक्षाला त्यामुळे बळकटी मिळेल,” असे मत राज्याचे मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
उद्या खडसेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यास भाजपाला जय महाराष्ट्र निश्चित होणार
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना भेटल्यानंतर खडसे पवारांच्या भेटीला; भाजपवर ओबीसी नेत्यांचा राजकीय बॉम्ब पडणार?
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'ना सर्वाधिक संधी दिल्याचं सांगत पंकजा मुंडेंच्या मागण्या अमान्य करण्याची रणनीती
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी मोठा राजकीय निर्णय घोषित करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यानंतर यावर भारतीय जनता पक्षातील केंद्रापासून ते राज्यातील नेते मंडळी हिदुत्वापेक्षा थेट ओबीसी’च्या मुद्यावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी
भारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने रोहिणी खडसे पराभूत झाल्या: गिरीश महाजन
जळगावात येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रतिउउतर दिलं आहे. महाजन म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने खडसे यांना तिकीट नाकारल्याने अधिक फरक पडला नाही.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात जाताच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. तसेच त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी काढलेल्या मोर्चाची तसेच गाडीभर पुराव्यांवरून देखील मोक्याच्या क्षणी लक्ष केल्याने वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
याला बातमीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL