महत्वाच्या बातम्या
-
भाजप आणि फडणवीसांचा दिलदारपणा? | थांबा! राजकीय गेम पुढे आहे | शिंदेंच्या खांद्यावर बंदूक का? | काय आहे संपूर्ण योजना
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसंच मी सरकारच्या बाहेर असणार आहे असंही त्यांनी सांगितलं तोच हा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं तसंच उपमुख्यमंत्री व्हावं याकरिता आम्ही आग्रही आहोत असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार | फडणवीस बाहेरून नियंत्रण ठेवतील
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात आजच शपथ घेणार
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन पळून गेले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाला सत्ता मिळणार | पण ती प्राप्त करण्याच्या प्रकारामुळे शिंदेंविरोधात लोकांच्या मनात प्रचंड खदखद
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बुधवारी कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद करतानाच राजीनामा देत असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे उतावळ्या भाजपने लगेच ‘ये तो सिर्फ झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है’ असं ट्विट केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र भविष्यात महाराष्ट्र आणि मुंबई विरोधी जे काही होईल त्याला शिंदे पिता-पुत्रच कारणीभूत असतील अशी जहरी टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. शिंदे हे आत्मसन्मान गुजरातच्या चरणी ठेऊन आल्याने ती पूर्णपणे भाजपकडून ऑपरेट केले जातील असं नेटिझन्स ठामपणे सांगत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार
सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा निकाल दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुमारे चार तास चर्चा झाली. अखेर चार तासांच्या तीव्र चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. उद्या बहुमताने सुनावणी होईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. राष्ट्रवादीसोबत बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरू आहे. मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत हे 3 खासदार आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
जर यांनी फ्लोअर टेस्टचं म्हटलं तर काय? | यावर न्यायालयाने स्पष्ट केलंय की, आमचे दरवाजे खुले आहेत - अरविंद सावंत
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानं सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले होते. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील राजकारण याच भोवती फिरत असून, सरकारच्या भवितव्याबद्दलची महत्त्वाची घडामोड घडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश | शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात संध्याकाळी ५ वाजता सुनावणी
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेकडून याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करा | राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना आदेश जारी | आता पुढे काय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकार यांनी बहुमत गमावले, असे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करा, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिले आहेत. त्यामुळे गुरुवारचा दिवस ठाकरे सरकारसाठी निर्णायक ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार आहे. महाराष्ट्रात सतनाटय़ाचा हा आठवा दिवस आहे. महाविकास आघाडी सरकारचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षणाला नवनव्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आपण राजीनामा देणार नाही, यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला मंत्रिमंडळाचाही पाठिंबा आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरू होऊन आठ दिवस उलटले आहेत. गेल्या आठ दिवसांत राज्यात अभूतपूर्व विकास होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचा वापर अपेक्षित नव्हता, तसाच महाराष्ट्रातही राजकीय धुसफूस सुरू आहे, यात शंका नाही.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला?
गुवाहाटीत आलेले कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ते सांगावं. कारण असं काहीही नाही. आम्ही सगळे एक आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आज रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जर उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावं सांगावीत असं थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
एकनाथ शिंदे हे गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. आज सातवा दिवस असून, भाजपच्या गटाने जोर धरला आहे. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबईहून एक खासगी विमान दिल्लीकडे रवाना झालं आहे. महाराष्ट्रातील सत्तेच्या नाट्यावर नवी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत. विशेषत: सर्वोच्च न्यायालयाचे वकील महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत आहेत. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहेत.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत
एकनाथ शिंदे गट सध्या गुवाहाटीमध्ये आहे. त्यांचा मुक्कामही जुलै महिन्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. शिंदे गट आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत तळ ठोकून आहे. एकीकडे तज्ज्ञांनी दावा केल्याप्रमाणे शिंदे गट भाजप किंवा प्रहार संघटनेत सामील होऊ शकत नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाला स्वतंत्र मान्यता मिळू न शकल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला हवा कारण सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी ही मागणी केली आहे. जर तुमच्यासोबतचे ५१ आमदार गुवाहाटीला आले आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसून कसे राहू शकता? तुमचं सरकार अल्पमतात आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेत असं आधी कधी घडलेलं नाही.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला, निर्णय नव्हे | राज्यपालांना अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही | शिंदेंचा विजयाचा उतावळेपणा
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष हा आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. ही लढाई आता ११ जुलैपर्यंत लांबली आहे कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचं बंडखोर आमदारांचं निलंबन ११ जुलैच्या सुनावणीपर्यंत करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे. बंडखोर आमदारांपैकी १६ जणांवर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई शिवसेनेने केली होती.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते
२१ जूनला महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं बंड समोर आलं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ३५ पेक्षा जास्त आमदारांचा गट घेऊन सुरतला गेले. ही बंडखोरी ही शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी आहे. शिंदे गटात आता ३९ शिवसेना आमदार आहेत तर १२ अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांची संख्या ५१ झाली आहे. आता बंडखोर आमदारांचा हा गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी करतो आहे.
3 वर्षांपूर्वी -
दोन तृतीयांश सह वेगळा गट केल्यास दुसऱ्या पक्षात विलीनीकरण करावंच लागेल अन्यथा सगळेच अपात्र ठरतील - घटना तज्ज्ञांचं मत
गुहावटीमध्ये बसलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर आमदरांना अपात्रतेच्या नोटीसवरती म्हणंण मांडण्यासाठी आज 5.30 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या आमदारांना 12 जुलै संध्याकाळी 5.30 पर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल