महत्वाच्या बातम्या
-
Sambhaji Bhide Meet Eknath Shinde | उदयनराजेंच्या पाठोपाठ संभाजी भिडेगुरुजी एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या गावी जाऊन भेट घेतली. भाजप खासदार उदयनराजेंच्या भेटीनंतर लगेच भिडेगुरुजींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीची भिडेगुरुजी यांनी पहाणी केली. शिंदे यांच्या शेतात गुरुजींच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
माझी निष्ठा शिवसेनेसोबतच | राणेंच्या खात्याचे निर्णय मोदींच्या संमतीशिवाय मंजूर होत नसावेत - एकनाथ शिंदे
जन आशीर्वाद’ यात्रेनिमित्त वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले. तसेच शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेने नेते एकनाथ शिंदेंच्या संदर्भात नारायण राणेंचा खळबळजनक दावा | काय म्हणाले?
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या राज्य समन्वयक डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपला रामराम | शिवसेनेत प्रवेश
पाचोरा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोरा शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल होत आहे. पाचोरेकरांना कार्यसम्राट आमदार लाभला असुन पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाचोरा – भडगाव तालुक्यात एकही काम शिल्लक राहणार नसल्याचे राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
झालेली घटना दुर्दैवी | मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही - एकनाथ शिंदे
बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.
4 वर्षांपूर्वी -
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनानं गाठलं आहे. बुधवारी शिंदे यांनी करोनाची चाचणी केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मातोश्री हे मराठी माणसाचं श्रद्धास्थान | दाऊदच्या बापालाही आम्ही घाबरत नाही - एकनाथ शिंदे
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुस्लीम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा: मंत्री एकनाथ शिंदे
मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लीम बांधवांनी आरक्षणाची मागणी जोर लावून धरली आहे. मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे. शिवसेनेकडूनही आता मुस्लीम आरक्षणाला समर्थन देण्यात आलं आहे. मंत्री एकनाथ शिंदेंनी नवाब मलिक यांच्या घोषणेला दिला पाठिंबा दिला आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकासआघाडीचा प्रयत्न आहे. ठाकरे सरकार समाजाच्या हिताचे निर्णय घेईल असा विश्वासही यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच शिवसेनेचा मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ वा कामकाज आम्ही करत नाही: एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या २ आमदारांना पकडून आणलं
राज्याच्या राजकारणातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असेच म्हणता येईल कारण राज्यात महाविकासआघाडीची एकीकडे सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना हा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपाचं नवं सरकार स्थापन स्थापन झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्या नंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी देखील शपथ घेतली आहे. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी हा शपथविधीचा सोहळा पार पडला.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी पुन्हा निवड
शिवसेनेच्या विधानसभेतील गटनेतेपदी कुणाची निवड होणार? याविषयी गेल्या २ दिवसांपासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरेंची देखील गटनेतेपदी निवड होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, अखेर विद्यमान गटनेते एकनाथ शिंदे यांचीच एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची शिवसेना भवनावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्येच एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नितीन नांदगावकर अचानक सेनेत गेले? नाही! अशा घडामोडी घडवल्या गेल्या: सविस्तर
‘जय महारष्ट्र, मी महाराष्ट्र्र सैनिक’, असे म्हणत सोशल मीडियावर खळखट्ट्याक करणाऱ्या मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी हातावर शिवबंधन बांधत मनसेची साथ सोडली आहे. नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. त्यांनी बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना धक्का बसला आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर चर्चा रंगली ती नितीन नांदगांवकर यांना मनसेने तिकीट का नाकारलं याचीच.
5 वर्षांपूर्वी -
शहापूर राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा राष्ट्रवादीला रामराम..शिवबंधन बांधणार
ठाण्यातील एनसीपीचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवतील हे जवळपास नक्की झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यात अनेक नगरसेवक उत्तर भारतीय, आम्ही युपी'वाल्यांच्या पाठीशी खंबीर: एकनाथ शिंदे
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. मराठी माणसासाठी एकही उच्चार न करता त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंकडे आयआरबीच्या उपकंपनीची कार - टोल माफी हा जुमला?
एकनाथ शिंदेंकडे आयआरबीच्या उपकंपनीची कार – टोल माफी हा जुमला?
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News