महत्वाच्या बातम्या
-
कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो: सविस्तर
यापूर्वी देशातील अनेक नामांकित प्रसार माध्यमांनी २०१४ ते २०१८ या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलचा अभ्यास केला. त्यावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, एक्झिट पोलमुळे आपल्याला केवळ कोण जिंकणार याचा अंदाज येतो, मात्र त्यातून कोणत्या पक्षाच्या नेमक्या किती जागा निवडून येतील, हे खात्रीपूर्वक समजू शकत नाही. अगदी यासंबंधित उदाहरण म्हणजे २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकतर्फी जिंकेल असं भाकीत त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्झिट पोलनं केलं होतं. त्यावेळी C-Voterनं असा अंदाज व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पक्षाला एकूण १११ जागा प्राप्त होतील आणि काँग्रेसला केवळ ७१ जागांवर समाधान मानावे लागेल. तर दुसरीकडे टुडे’ज चाणक्यनं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला तब्बल १३५ जागा मिळतील आणि काँग्रेसला केवळ ४७ जागा मिळतील.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, गाडी पेटवली
राज्यात मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ६५ ठिकाणी ईव्हिएममध्ये बिघाड; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्सव लोकशाहीचा: मतदानाचा हक्क पार पाडण्यासाठी मतदार सज्ज
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुका १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान; तर १० सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता?
कोणत्या निवडणूका आणि आचारसंहिता केव्हा लागेल याचा अंदाज निवडणूक आयोगापेक्षा भारतीय जनता पक्षाचे नेतेच अधिक वर्तवितात आणि ते अचूक ठरतात हे नित्याचे झाले आहे. यापूर्वी देखील मुख्य निवडणूक आयोगाच्या आधी भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणुकीच्या तारखांचे भाकीत वर्तविले होते आणि त्या अचूक ठरल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी संशय व्यक्त करतं निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा, ममता-मोदी वर्ड वॉर
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीतील ‘वर्ड वॉर’ जरा जास्तच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक काही थांबता थांबेना. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या म्हणाल्या, ‘मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहेत’. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असंही त्या पुढे म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबलं तरी मत भाजपला - प्रकाश आंबेडकरांचा आरोप
सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी
मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ई.व्ही.एम. मध्ये बिघाड, सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान
आज महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. परंतु बऱ्याच ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाडीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि पर्यायी लोकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागले. बरेच लोक रांगा पाहून पुन्हा मतदान न करता घराकडे वळाले आणि याचा एकंदरीत परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं ठरलं, या दिवशी होणार लोकसभेचा निर्णय जाहीर
मुंबई : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्या बरोबर सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपल्या उमेदवारांच्या २ याद्या जाहीर देखील केल्या. परंतु १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसेचा लोकसभेबाबतचा निर्णय जाहीर करतील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यात राज ठाकरे आघाडी सोबत जाणार कि स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मनसेला अपेक्षित असलेल्या ईशान्य मुंबई आणि कल्याणच्या जागेवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर - पार्थ पवार, अमोल कोल्हे, समीर भुजबळ यांना उमेदवारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघातून अपेक्षे प्रमाणे अखेर पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचार संहिता हि लागू झाली आहे. परंतु भाजप नेतृत्व आणि नेते, उच्च पातळीवर असो कि खालच्या लेवल ला सगळेच भाजपवाले आचार संहितेचा भंग करताना दिसत आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेना - भाजप षटकार मारण्याच्या तयारीत? लोकसभा - विधानसभा एकत्रित?
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखिल लोकसभे सोबत घेण्यात येतील अशी माहिती काही सूत्रांनी दिली असून शुक्रवारी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने युतीच्या वेळेस भाजपला काही अटी सांगितल्या होत्या आणि त्यातली एक अट म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाव्यात.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल