महत्वाच्या बातम्या
-
पाचही राज्यांमध्ये हजारोंच्या निवडणूक रॅली होत असातना निवडणूक आयोग परग्रहावर होता काय? - मद्रास हायकोर्ट
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. याची मद्रास हायकोर्टाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची | संसदेत चर्चा व्हावी
आजच्या सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर सडकून टीका करण्यात आली आहे. आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळयावर संसदेत तरी चर्चा व्हावी, अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल पंपांवरील मोदींचे होर्डिंग हटविण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने या राज्यांमधील सर्व पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. पीटीआयने विश्वासू सूत्रांच्या आधारे याबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना पसरतोय? | दुसरीकडे 5 राज्यांतील निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता
देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज संध्याकाळी जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. पश्चिम बंगाल, तमिलनाळू, आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत या निवडणुका होणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील केवळ एक राज्य आसाममध्ये भाजपची सत्ता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने BJP IT सेल संबंधित कंपनीला नियुक्त केलं होतं?
महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा दावा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतल भारतीय निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील सर्व निवडणुकांना अनिश्चित काळासाठी स्थगिती
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन
निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे रविवारी रात्री ९.३० वाजता चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ६५ ठिकाणी ईव्हिएममध्ये बिघाड; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दरबारी प्रसार माध्यमांना दणका! निवडणूक काळात एक्झिट आणि ओपिनियन पोलवर बंदी
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. एन निवडणुकीच्या काळात मतदानापूर्वी विशिष्ट पक्षाच्या हितासाठी काही पोल्स सार्वजनिक करण्याच्या सपाटा लावला जातो. मतदार देखील अशा पोल्समुळे प्रभावित होण्याची शक्यता अधिक असल्याने विरोधकांनी अनेकवेळा यावर लक्ष केंद्रित करण्याचे निवडणूक आयोगाला कळविले होते.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल
संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबर (गुरूवार) रोजी जाहीर होणार असून दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजब दावा? ईव्हीएमवर खापर फोडणे ही गुन्हेगारी मानसिकता: मुख्य निवडणूक आयुक्त
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केल्याचे आरोप हे अन्यायकारक असून त्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कुटील हेतू आहे असे मत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे आयआयएम कलकत्ता या संस्थेच्या वार्षिक व्यावसायिक परिषदेत त्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काही वेळा बिघडली असतीलही, जशी इतर यंत्रे बिघडतात तशी ही यंत्रेही बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही हे सिद्ध झालेले आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांचं ठरलं आहे? निवडणुका ईव्हीएम'वरच; बॅलेट बॉक्स आणणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात (ईव्हीएम) विरोधी पक्षांकडून देशभरात आवाज उठवला जात असतानाच या मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिका वापरण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी स्पष्ट फेटाळून लावली. या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाने गतकाळात दिलेल्या काही आदेशांचा आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते असे सांगत, मतदानासाठी पुन्हा मतपत्रिका वापरल्या जाव्यात अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: मतदार यादी दुरूस्ती व नोंदणी कार्यक्रम सुरू; अंतिम तारीख १९ ऑगस्ट
भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली असून दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ही अंतिम तारीख असणार आहे. दरम्यान मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचार संहिता हि लागू झाली आहे. परंतु भाजप नेतृत्व आणि नेते, उच्च पातळीवर असो कि खालच्या लेवल ला सगळेच भाजपवाले आचार संहितेचा भंग करताना दिसत आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS