Employees Income Tax Deduction | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, स्टँडर्ड डिडक्शनचा मोठा लाभ मिळणार, CBDT चं उत्तर आलं
Employees Income Tax Deduction | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नवीन कर प्रणाली चा अवलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्याविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आता 15.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना टॅक्सवर एकूण 52,500 रुपये (स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये) लाभ मिळणार आहे. १५.५ लाखरुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही, या सीतारामन यांच्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यावर स्पष्टीकरण दिले आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ अशा सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे, त्यांचे उत्पन्न कितीही असो.
2 वर्षांपूर्वी