अमेरिकेने ड्रोन पाडल्याने इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त; तणाव वाढला
इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दरम्यान परिस्थिती चिघळल्यास त्याचे थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील होतील असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती स्थानिक प्रसार माध्यमांना दिली आहे.
5 वर्षांपूर्वी