महत्वाच्या बातम्या
-
Sneha Aniket Vishwasrao | अभिनेता अनिकेत विश्वासराविरोधात पत्नीचा छळ-मारहाणीचे आरोप | पोलिसात गुन्हा दाखल
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात त्याची पत्नी स्नेहा विश्वासराव (Sneha Aniket Vishwasrao) हिने कौटुंबिक हिंसाचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याचवेळी स्नेहाने आपल्या सासू-सासऱ्यांविरोधात देखील तक्रार केली आहे. याचप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याने मराठी सिनेसृष्टीत मात्र एकच खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Squad Review | रिनजिंग डेन्झोंगपाचा डेब्यू चित्रपट 'स्क्वॉड' थरार
नुकताच ‘स्क्वॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातून अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांचा मुलगा रिंजिंग हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याला अॅक्शन हिरो म्हणून स्क्वॉडमधून लॉन्च करण्यात आले आहे. अनिता राज यांची भाची मालविका राज देखील या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मालविकाने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात पूजा (करीना कपूर) ची बालपणीची भूमिका (Squad Review) साकारली होती.
3 वर्षांपूर्वी -
Sooryavanshi on Netflix | 'सूर्यवंशी' चित्रपटाचा OTT'वर धुमाकूळ | नेटफ्लिक्स, मेकर्समध्ये करोडोची डील
अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला लोक खूप प्रेम देत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर टाळ्या लुटणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला 8 दिवस पूर्ण झाले असून या 8 दिवसात चित्रपटाने 120 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 100 कोटी क्लबमध्ये चित्रपटाचा समावेश झाल्यानंतर निर्मात्यांनी आता चित्रपट ओटीटीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी (Sooryavanshi on Netflix) केल्याचे वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
Vicky Kaushal Katrina Kaif Wedding | विकी आणि कतरिनाच्या लग्नात या पाहुण्यांना विशेष निमंत्रण
विकी कौशल आणि कतरिना कैफ आजकाल त्यांच्या चित्रपटांपेक्षा लग्नासाठी जास्त चर्चेत आहेत. हे दोन्ही सिनेस्टार पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. कतरिना-विकी दोघेही राजस्थानमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत शाही विवाहसोहळा पार पाडणार आहेत. आतापर्यंत दोघांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding) आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Puneeth Rajkumar Passes Away | कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू
कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार याच्या चाहत्यांना शुक्रवारी अभिनेत्याच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळताच त्यांना धक्का बसला. पुनीत राजकुमार यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुनीतवर काही काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथील (Puneeth Rajkumar Passes Away) विक्रम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
4 वर्षांपूर्वी -
महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगाने होते पीडित | यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतले
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आता बातमी आहे की, अलीकडेच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महेश मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश आता घरी परतले असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
बेजबाबदार पत्रकारिता | राज कुंद्रा प्रकरणातील आरोप उमेश कामत दुसराच | बदनामी आपल्या उमेश कामतची
सध्याची पत्रकारिता सुद्धा वास्तवापेक्षा गुगल भरोसे झाली आहे असं म्हणावं लागेल. त्यात कोणतीही खातरजमा न करता कोणाचाही फोटो केवळ नावात साम्य असल्याने गुगल सर्च मध्ये मिळतो आणि तोच फोटो उचलून थेट वृत्त प्रसिद्ध केली जातात. असे प्रकार हिंदी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र देशभरात गाजणाऱ्या एखाद्या किळसवाण्या प्रकरणात काहीच संबंध नसणाऱ्या व्यक्तीची नाहक बदनामी केली जाते हे अत्यंत भीषण आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सारेगमप लिटिल चॅम्प्स सोबत रंगणार जागर लोकसंगीताचा | स्वरा जोशी सगळ्यांची लाडकी
सारेगमप लिटिल चॅम्प्सचे १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. छोटे गायक तसंच अतिशय उत्तम छोटे वादक देखील आपल्याला या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुरेख गाण्यांनी एक वेगळाच माहोल या लिटिल चॅम्प्सनी तयार केला. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धकांच्या टॅलेंटची झलक पाहून या कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड या यांच्यासाठी परीक्षण करणं हे खूप अवघड असणार आहे हे मात्र नक्की.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चक्काजामवर सुमित राघवन भडकला | म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे?
भारतीय जनता पक्षानं राज्यभरात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईतील दहिसर-मीरारोड या भागातही प्रदर्शनं केली गेली. या आंदोलनादरम्यान कोरोनाचे सर्व नियम मोडल्याचं दिसून आलं. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंसिंग असण्याचा तर प्रश्नच नव्हता. या प्रकारावर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन संतापला आहे. अशी आंदोलनं करुन नेमकं तुम्ही काय साध्य करताय? असा थेट सवाल त्यानं भाजपाला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | राकेश-दक्षिणाच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बूक केलं | विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती
जेव्हा देशात कोरोनाच्या संकटामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा काळात सरकारने लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू केले आहेत. लग्नाच्या या मौसमात अनेक लोकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही लोक या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो
देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मार्ग स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नको तिथे विवादित वक्तव्य | कंगना स्वतःच ठरतेय स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागील कारण
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना रानौत ट्विटरवर नको ते बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आनंद साजरा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले
प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा याचे कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झाले. पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर केली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी समाज माध्यमांवरून राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं.
4 वर्षांपूर्वी -
कंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार!
देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल निकालानंतर कंगना पिसाळली? | गुजरात दंगलीचं अप्रत्यक्ष उदाहरण देत मोदींना रुद्रावतार घेण्यासाठी ट्विट
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ट्विटरला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीदेखील केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं
मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलीवूड कलाकारांना किंमत चुकवावी लागतेय - शिवसेना
आयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील 4 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि ऑफिसवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुस-या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
फँड्री फेम जब्या | सोमनाथ अवघडे'चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा'
Rang Pirticha Bawara Song, फँड्री फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे’चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ‘फ्री हिट दणका’ या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | महिला डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल | काय कारण?
समाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. समाज माध्यमांवरील युजर्स यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देत असतात. समाज माध्यमांवर अनेक मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक डॉक्टरांचा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता सहा महिला डॉक्टर वेगवेगळ्या कलरचे स्क्रब घालून एक एका इंग्रजी गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA