EPF Money Limit | नोकरदारांसाठी खुशखबर! पगारातून कापला जाणाऱ्या EPF ची रक्कम वाढणार, लिमिट रु.25000 होणार
EPF Money Limit | तुम्हीही प्रायव्हेट नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. होय, यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रॉव्हिडंट फंड (EPF) वाढू शकतो. सीएनबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, भविष्य निर्वाह निधीसाठी (EPF) पगाराची कमाल मर्यादा वाढवली जाऊ शकते. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पात याची घोषणा होऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात वेतनमर्यादा वाढवण्याची घोषणा करू शकतात.
6 महिन्यांपूर्वी