EPFO Interest Money | तुमच्या ईपीएफ खात्यात व्याजाचे किती रुपये येतील?, फायद्यांचं गणित समजून घ्या
EPFO Interest Money | लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खातेदारांच्या खात्यात सरकार पैसे टाकणार आहे. तुमच्या पीएफमध्ये जमा झालेल्या रकमेवर ईपीएफ व्याजदर निश्चित केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात खातेदारांना त्यांच्या ठेवींवर 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. मात्र, ‘ईपीएफओ’ने व्याजाचे पैसे किती काळ जमा होतील, हे अद्याप सांगितलेले नाही. ऑक्टोबरपर्यंत सर्व खातेदारांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी अपेक्षा आहे. परंतु, ईपीएफ खात्यातील व्याज कसे मोजायचे हे तुम्हाला माहीत आहे का?
2 वर्षांपूर्वी