EPFO Money in Adani Group | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा ईपीएफचा पैसा अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवला जातोय, शेअर्समध्ये घसरण
EPFO Money in Adani Group | देशातील सर्व प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकतीच घसरण होऊनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुंतवणूक सुरूच ठेवली आहे. सुमारे २७७.३ दशलक्ष भारतीयांच्या बचतीचे व्यवस्थापन करणारी ही सरकारी संस्था अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स या अदानी समूहाच्या दोन शेअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक करून नोकरांचा पैसा ओतत आहे. विशेष म्हणजे याचा नोकरदारांना काहीच फायदा होणार नसून त्याचा फायदा होईल तो अडाणी ग्रुपला. या गुंतवणुकीमुळे अदानी ग्रुपच्या बाजार भांडवलात वाढ होईल आणि त्याचा उपयोग ते अजून कर्ज उभारणीसाठी करतील असं म्हटलं जातंय. EPFO केंद्राच्या अखत्यारीत येतं असल्याने यामागे देखील मोदी सरकारच असणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावरून राहुल गांधी सामान्य लोकांना जागृत करत आहेत हे देखील स्पष्ट होतंय. त्यासाठीच त्याचा आवाज संसदेपासून बंद केला जातोय हे देखील अधोरेखित होतंय.
2 वर्षांपूर्वी