Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार
ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक वेळा असे होते की आपण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर रिव्ह्यू वाचून खरेदी करता आणि नंतर आपल्याला कळते की रिव्ह्यूमध्ये केलेले दावे बनावट होते. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्समधील या फेक रिव्ह्यूंना आळा घालण्यासाठी सरकारने एक फ्रेमवर्क जाहीर केला आहे. ग्राहकांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं शनिवारी सांगितलं. याअंतर्गत ई-कॉमर्स वेबसाइटवर पोस्ट केलेल्या फेक रिव्ह्यूवर नजर ठेवण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी