महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलन देशभर जाणार | एनडीए’तून बाहेर पडलेले पक्ष उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीला
‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये देखील शिवसेना सहभागी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्राकडून तारीख पे तारीख | संयुक्त राष्ट्राकडूनही आंदोलनाचं समर्थन
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. समाज माध्यमांवर देखील शेतकरी आंदोलनाविरुद्ध ट्रेंड सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे हिंदू गद्दार | आंदोलक शेतकऱ्यांसमोरील भाषणात युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य
केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
4 वर्षांपूर्वी -
बळीराजा संतापलाय | थेट संसदेला घेरण्याच्या इशारा | आज महत्वाची बैठक
केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुधारणा नको, कायदेच रद्द करा | शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे केंद्राचे धाबे दणाणले
दिल्लीतील कृषि कायद्याविरुद्धचा शेतकऱ्यांचा लढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि जिद्दीपुढे केंद्र सरकार पूणर्पणे थकल्यासारखं वागत आहे. बैठकांचा सपाटा सुरु झाला असला तरी केंद्राच्या पळवाटांवर शेतकरी विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचं दिसतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्नदात्याने मोदी सरकारचं जेवण नाकारलं | म्हणाले आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय
सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली होती. आता केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनासाठी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Former Chief Minister of Punjab Parkash Singh Badal ) यांनी पद्म विभूषण (Padma Vibhushan Award) पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढींढसा (Akali Dal Leader Sukhdev Singh Dhindsa) यांनीही आपला पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केलीय.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | भाजपचे धाबे दणाणताच चीन-पाकिस्तानच्या हाताचा कांगावा
मागील 8 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरीही संतप्त झाले आहेत. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याला तीव्र विरोध | प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला
केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Former Chief Minister of Punjab Prakash Singh Badal) यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण (Return his Padma Vibhushan Award) हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला.
4 वर्षांपूर्वी -
वृद्ध शेतकरी आंदोलक महिलेची खिल्ली उडवल्याने कंगनाला कायदेशीर नोटीस
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत अनेकदा विवादित, धार्मिक तसेच जातीय ट्विट करण्यासाठीच प्रसिद्ध होऊ लागली आहे. सध्या ती विवादित ट्विट करण्यात नव नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. यापूर्वी तिने आंदोलक शेतकऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती आणि तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एका वयोवृद्ध आजींवर टीका केल्याने ती नव्या वादात अडकली आहे. समाज माध्यमांवर तिला नेटिझन्सने धारेवर धरल्यावर तिने लगेच ट्विट डिलीट करण्याचा पराक्रम केला होता.
4 वर्षांपूर्वी -
अखेर मोदी सरकार झुकलं | शेतकऱ्यांसोबत आजच बिनशर्त चर्चा
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आपल्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी पूर्णपणे ठाम आहेत. दुसरीकडे, बिनशर्त चर्चा करण्यासाठी सरकारनं तयारी दर्शवत अखेर आज शेतकरी संघटनांना चर्चेसाठी पाचारण केलं आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना केंद्र सरकारसशी चर्चेसाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागणार नाही. केंद्र सरकारच्यावतीनं या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत इतर काही मंत्री उपस्थित राहू शकतात असं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे मागे घ्या | अन्यथा.... NDA'चे घटक पक्ष संतापले
कृषी कायद्यावरून सध्या देशभर वातावरण तापलं आहे. हरयाणा आणि पंजाबमधून होतं असलेला विरोध सध्या देशभर पसरू लागला असून मोदी सरकार देखील पेचात अडकलं आहे. लाखो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्ली गाठल्याने भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. केंद्राने चर्चेची तयारी दाखवली असली तरी त्यापूर्वी गुंता वाढताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी | आता आजींची खिल्ली उडवली | कंगनाचा मुजोरपणा उच्चांकावर
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत अनेकदा विवादित, धार्मिक तसेच जातीय ट्विट करण्यासाठीच प्रसिद्ध होऊ लागली आहे. सध्या ती विवादित ट्विट करण्यात नव नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. यापूर्वी तिने आंदोलक शेतकऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती आणि तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एका वयोवृद्ध आजींवर टीका केल्याने ती नव्या वादात अडकली आहे. समाज माध्यमांवर तिला नेटिझन्सने धारेवर धरल्यावर तिने लगेच ट्विट डिलीट करण्याचा पराक्रम केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक | शेतकरी आणि पोलिसांदरम्यान दगडफेक
केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरयाणातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी सकाळी दिल्ली-हरयाणा सीमेवर अंबालाजवळ मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुरांचा वापर केला. दुसरीकडे पोलिसांना विरोध करताना आंदोलकांनी बॅरिकेड्सवर दगडफेक केली. ते उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत | १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आता शेतकर्यांनी कृषी कायद्याविरोधातील हे आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर एक ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन
संसदेत विरोधकांचा विरोध डावलून सविस्तर चर्चा न करताच संमत करण्यात आलेली कृषी विधेयके मोदी सरकारच्या अंगाशी आलेली दिसत आहेत. या तीन कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात भारतीय शेतकरी युनियनसहीत वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत. देशभर चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये ३१ संघटनांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे पारीत केलेल्या कषी बिल (Central Government Farm Bills) विरोधात देशभरात आवाज उठवला जात आहे. संसदेमध्ये या बिलास विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएतील काही घटकपक्षांनी विरोध दर्शवला. तरीही ही शेती विधेयक संसदेत सरकारने मंजूर केली. आता या बिलाचा विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या बिलाला विरोध करण्यासाठी 25 सप्टेंबरला म्हणजे उद्याच ‘भारत बंद’ (Bharat Bandh) घोषीत करण्यात आला आहे. उद्याच्या भारत बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरीही सहभागी झाले आहेत.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ही बंदची हाक दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बळीराजा दुर्लक्षितच | गेल्या ६ महिन्यांत राज्यात रोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
करोनाच्या संकटाने राज्याचं कंबरडं मोडलेलं असतानाच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या सत्रामुळे राज्य सरकारसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून या महिन्यात सरासरी दररोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुधाचे भाव १६ ते १८ रुपयांपर्यंत घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांच्या शेतमालाला भाजप सरकारकडूनच कवडीमोल भाव - नांदेड भाजपचे माजी खासदार सुभाष वानखेडे
भाजप नेत्यांच्या शेतमालाला भाजप सरकारकडूनच कवडीमोल भाव – नांदेड भाजपचे माजी खासदार सुभाष वानखेडे
7 वर्षांपूर्वी
५ एकर वांग्यावर ट्रॅक्टर फिरवला
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा