FASTag Rules | तुमची कार विकण्यापूर्वी फास्टॅगशी संबंधित हे नियम जाणून घ्या, अन्यथा अडचणीत येऊ शकता
FASTag Rules | टोल प्लाझावर लांब रांगा टाळण्यासाठी आणि वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी फास्टॅग सुरू करण्यात आला. टोलवर लोकांना लांबच लांब रांगांमधून सूट मिळावी आणि जॅमही कमी व्हावा यासाठी याचा वापर सुरू झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की, एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुमच्या वाहनाला फास्टॅग स्टीकर असतो आणि याच ठिकाणाहून टोलचे पैसे स्वत:हून कापले जातात. त्यासाठी तुमच्या गाडीची खिडकी खाली करून पैसे मोजावे लागत नाहीत. ही एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, ज्याच्या मदतीने टोल प्लाझावर टोल भरला जातो आणि फास्टॅगचा वापर पेमेंटसाठी केला जातो. पण जर कोणी त्यांची कार विकली असेल आणि फास्टॅग निष्क्रिय झाला नसेल तर त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया तुम्ही फास्टॅग डीअॅक्टिव्हेट कसे करू शकता.
2 वर्षांपूर्वी