महत्वाच्या बातम्या
-
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं मंगळवारी पुण्यात निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.
5 वर्षांपूर्वी -
निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश साबळे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरात ‘संभाजी ब्रिगेड’च्या वतीने पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'चला हवा येऊ द्या' वादात, संभाजीराजेंचा मालिका कलाकारांना इशारा
छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला असून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा मुळ फोटो फोटोशॉप करण्यात आला असून त्याला विनोदी अंगाने दाखवण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार, निर्माते आणि झी वाहिनी विरोधात संताप व्यक्त केला जात असून झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणी होत आहे. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही याची दखल घेत ‘माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू’, असा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं - जितेंद्र जोशी
सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. मात्र त्याचसोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे. या ट्रोलिंगवर अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं, असं त्याने म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
मी ब्राम्हण नाहीए बरं! CKP आहे..पण काम आहे माझ्याकडे
मराठीतील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुली दिसतात, असं वक्तव्य‘केसरी’चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीमध्ये केलं होतं. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे तेजश्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठी कलाकार व्यक्त झाले किंवा नाही झाले तरी ट्रोलिंग; सोनाली ट्वीटरकरांवर संतापली
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला होता. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे आणि पुढे काय दाखवायचे आणि काय नाही ते ?
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसंच आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नाही. शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - स्वीटी सातारकर' चित्रपटाचा याड लावणारा टीजर आणि धमाकेदार गाणं
काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळनं स्वीटी सातारकर नामक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियात पोस्ट टाकून केली होती. त्यामुळे ही स्वीटी सातारकर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. या स्वीटी सातारकरचा पत्ता आता सापडला आहे. स्वीटी सातारकर या चित्रपटाचा धमाल टीजर सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तेजश्री प्रधानचा हा 'बोल्ड सिन' पाहिलात?
मालिका, नाटक आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान बॉलिवड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
#फोटो: मराठी चित्रपट श्रुष्टीतील सौंदर्यवती म्हणजे वैदेही परशुरामी; एकदा फोटो बघाच
मराठी चित्रपट श्रुष्टीतील एक सुंदर चेहरा म्हणजे वैदेही परशुरामी. ‘सिम्बा’ चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण, एक मराठी मुलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. ही मुलगी आहे मुंबईची वैदेही परशुरामी. ‘सिम्बा’मध्ये वैदेही नायिकेच्या भूमिकेत असलेल्या सारा अली खान हिच्यावरही भारी पडली आहे. वैदेहीनं मुंबईमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य वकील आहेत. आई, बाबा आणि भाऊ हे तिघे ही वकिली व्यवसायात आहेत. चला पाहूयात या मराठमोळ्या अभिनेत्रीचे काही खास फोटो.
5 वर्षांपूर्वी -
तान्हाजी: सूर्याजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो
अजय देवगण- काजोल आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला. फक्त ६ दिवसांमध्ये अजय- सैफच्या या सिनेमाने १०७.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला १०० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा तान्हाजी हा पहिला सिनेमा ठरला आहे. वीकडेमध्ये सिनेमा ज्याप्रकारे कमाई करत आहे, यावरून सिनेमाच्या कथेत किती ताकद आहे ते दिसतं. सिनेमा लवकरच १५० कोटींची कमाईही करेल.’ दरम्यान महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झालं आणि तसा निर्णय घोषित करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
फिल्मी देशभक्त! अनेकांकडून छपाक'चं बुकिंग कॅन्सल...पण तिकीट सर्वांचं सारखंच
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर जोरदार टीका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दीपिकानं जेएनयूच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यानंतर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील नेत्यांकडून करण्यात आली. त्यासाठी दीपिकाच्या आगामी छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन समाज माध्यमांवरून करण्यात आलं. त्यासाठी #boycottchhapaak वापरण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - 'पानिपत'! मराठयांची ऐतिहासिक आठवण; ऍक्शन सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत हे ऐतिहासिक स्थळ…’हर हर महादेव’चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज…. मराठ्यांचा इतिहास भव्य – दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे -सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. यात आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
6 वर्षांपूर्वी -
भोंगा या मराठी चित्रपटाला राट्रीय पुरस्कार जाहीर.
नवी दिल्लीत ६६ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आले. त्यात भोंगा या चित्रपटाला सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नलिनी प्रोडक्शन प्रदर्शित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित या चित्रपटात कामगारांच्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्यावर येणाऱ्या अडचणी संकट याला तो कामगार कसा समोरा जातो.
6 वर्षांपूर्वी -
अखेर अक्षय'ची माघार; ’मिशन मंगल’ मराठीत डब न करण्यावरून होता वाद
अभिनेता अक्षय कुमारने त्याचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हमधून त्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतल्याचे जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी -
संजय दत्त यांच्या बाबा चित्रपटाची गोल्डन ग्लोब मध्ये निवड.
संजय दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेला बाबा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात मूक बधिर जोडप्याची व त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाची शंकरची कथा मांडण्यात आली आहे. अचानक शहरातील एक दाम्पत्य शंकरवर त्यांचा हक्क सांगते. तीखूनच पुढे शंकरच्या आई वडिलांचा लढा सुरु होतो. आपल्या मुलाला मिळवण्यासाठी बाबानी केलेला संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
फोर्ब्स इंडिया: दीपिका पदुकोण ठरली जगातली सुंदर महिला
फोर्ब्स इंडियाने नुकतीच १०० ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीमध्ये पहिल्या ५ अभिनेत्रींनमध्ये दीपिकाने स्थान मिळवले आहे. दीपिका पदुकोण हि बॉलिवुडमधल्या महागड्या अभिनेत्रीनपैकी एक आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिचे सौंदर्य सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. दीपिकाने वर्ल्ड मोस्ट गॉरजियास वुमन २०१९ हा किताब आपल्या नावावर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार'ला एका महिलेने पाठविले अश्लील मेसेज
झी मराठी वाहिनी वरील तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांच्या अगदीच पसंतीस पडली. त्याचप्रमाणे मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार हिने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच ह्या मालिकेचा शेवट झाला असून विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच भावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO : ‘ये रे ये रे पैसा 2’चा धमाकेदार ट्रेलर लाँच!
लंडनमध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद… हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर आगामी मराठी चित्रपट ‘ये रे ये रे पैसा २’मधील आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK