Fixed Deposit Penalty | तुम्ही बँकेतील FD मदतीआधी तोडल्यानंतर किती नुकसान होते? किती दंड भरावा लागेल जाणून घ्या
Fixed Deposit Penalty | एफडीमध्ये जमा केलेली रक्कम ठराविक कालावधी साठी लॉक केली जाते. हा लॉक-इन कालावधी FD जमा करणाऱ्या व्यक्तीद्वारे निवडला जातो. मात्र, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडली तर तुम्हाला त्यावर दंड शुल्क भरावे लागेल. जेव्हा आपण एफडी मध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा दीर्घकाळ दृष्टीकोन ठेवून आपण पैसे गुंतवतो. मात्र काही वेळा आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात, अशा परिस्थितीत आपण काहीही विचार न करता एफडी तोडतो. मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडली तर तुम्हाला पूर्ण परतावा न देता बँक त्यातील काही रक्कम दंड म्हणून कापून घेते.
2 वर्षांपूर्वी