Forex Reserve | मोदी सरकारला धक्का, परकीय चलनाच्या बाबतीत भारत टॉप 5 देशांच्या यादीतून बाहेर, तैवान देशही भारताच्या वर
Forex Reserve | भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात पुन्हा एकदा घट झाली आहे. त्यात सलग आठव्या आठवड्यात घट नोंदविण्यात आली आहे. या घसरणीतील सर्वात मोठी घट परकीय चलन मालमत्तांमध्ये (एफसी) नोंदविण्यात आली आहे. या घसरणीनंतर २३ सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात ८.१३४ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ऑगस्ट २०२० नंतर परकीय चलन साठ्याची ही नीचांकी पातळी आहे. या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर भारत आता जगातील पहिल्या 5 परकीय चलन साठ्यासह देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.
2 वर्षांपूर्वी