Future Group Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे फ्युचर बदलेल? कंपनी संबंधित मोठी घडामोड सामोरे आली, सविस्तर माहिती
Future Group Retail Share Price | एकेकाळी भारतात रिटेल जायंट म्हणून मिरवणाऱ्या ‘फ्युचर ग्रुप’ च्या कंपन्या मोठ्या कर्जामुळे दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. याचा नकारात्मक परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. ‘फ्युचर रिटेल’ कंपनीवर प्रचंड कर्ज असल्याने कंपनीचे शेअर्स उच्चांक किंमत पातळीवरून जवळपास 100 टक्क्यांनी खाली आले आहेत. 27 नोव्हेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स 660 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या लोकांनी उच्चांक किमतीवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 300 रुपयांवर आले आहे. (Future Group Retail Limited)
2 वर्षांपूर्वी