Future Retail in NCLT | बिग बझार संचालित फ्युचर रिटेल कंपनी दिवाळखोर घोषित होणार, NCLT प्रक्रिया सुरू
बिग बझार रिटेल चेन चालवणारी फ्युचर रिटेल लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) मंजुरी दिली आहे. बँक ऑफ इंडियाने एनसीएलटीकडे मोठ्या प्रमाणात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या फ्युचर ग्रुप कंपनीविरोधात दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले होते, जे न्यायाधिकरणाने स्वीकारले आहे. इतकंच नाही तर एनसीएलटीने विजय कुमार अय्यर यांची फ्युचर रिटेलच्या रिझोल्यूशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. एनसीएलटीने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनचे आक्षेप फेटाळत फ्युचर रिटेलवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले.
3 वर्षांपूर्वी