Microsoft Deal in Gaming Sector | कँडी क्रश आणि कॉल ऑफ ड्यूटी गेमिंग निर्मिती करणाऱ्या कंपनीची मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार
गेमिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहे. ‘कँडी क्रश’ आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी’ या लोकप्रिय खेळांची निर्मिती करणारी ऍक्टिव्हिजन ब्लिझार्ड मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. हा करार $68.7 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी रुपये) मध्ये होणार आहे. हा व्यवहार पूर्णपणे रोखीने होईल. गेमिंग क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील असेल. या करारामुळे ‘एक्सबॉक्स’ बनवणारी मायक्रोसॉफ्ट कमाईच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी गेमिंग कंपनी बनणार आहे.
3 वर्षांपूर्वी