पुलवामा हल्ला ते लोकसभा निवडणूक...पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील त्रुटींना पंतप्रधान मोदी जवाबदार, माजी लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने खळबळ
General Shankar Roy Chowdhury | माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जवाबदार ठरवले आहे. घातपातामुळे सैनिक शहीद झाले आणि त्यात गुप्तचर यंत्रणेचं म्हणजे एनएसए’चं अपयश देखील तितकेच जवाबदार आहे असं लष्कराचे १८वे माजी लष्कर सेनाप्रमुख शंकर रॉय चौधरी म्हणाले. थेट माजी लष्करप्रमुखांनी मोदी सरकारला जवाबदार ठरवल्याने पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल अडचणीत सापडले आहेत. एकूण मोदी सरकारचा खरा चेहरा उघड होऊ लागला असून सैनिकांचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला गेल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. यामुळे भाजप पक्ष प्रचंड अडचणीत सापडला आहे.
2 वर्षांपूर्वी